धनकवडी : मनोरुग्ण अवस्थेत घरातून निघून गेलेली पासष्ट वर्षीय महिला तब्बल दहा वर्षांनी पुन्हा आपल्या घरी हेल्पींग हँन्ड सोशल फौंडेशनच्या मदतीने सुखरूपच नव्हे, तर बरी होऊन परतली. गेली दहा वर्षे बेपत्ता आई परतल्याचा आनंद तिचा मुलगा जगदीश दरेकर, पती गोविंद दरेकर, नातू व सूनेच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता. जुन्नर तालुक्यातील आर्वी या खेड्यातील सुमन गोविंद दरेकर (६५) या महिलेची ही कहाणी आहे.
सुमन मनोरुग्ण असल्याने तिच्या वर उपचार केले गेले; मात्र कोण तीच सुधारणा झाली नाही. अशा च अवस्थेत त्या कुणालाही न सांगता घरातून निघून गेल्या. दरेकर कुटुंबीयांनी विशेषत: तिच्या मुलाने तिचा नातेवाईकां सह विविध ठिकाणी शोध घेतला; मात्र पदरी निराशाच पडली. मनोरुग्ण अवस्थेतच भटकत-भटकत त्या पुण्यात कश्या पोहोचल्या ? याची पूर्ण माहिती सुद्धा कोणाला मिळाली नाही.
दरम्यान सात महिन्यांपूर्वी खडक पोलीस स्टेशन हद्दीत एक मनो रुग्ण महिला हलाखीच्या अवस्थे त पावसात भिजत असल्याची माहिती हेल्पिंग हॅन्ड सोशल फाऊंडेशनच्या स्वाती डिंबळे यांना मिळाली. डिंबळे यांनी तात्काळ त्या महिलेला ऐरवडा येथील मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. रुग्णालयात दाखल केल्यानंतर उपचारादरम्यान तिची स्मृती जागृत झाली. या काळात डिंबळे यांनी आपुलकीने महिलेशी बोलायला सुरुवात केल्यानंतर हळूहळू त्या बोलू लागल्या आणि आपले नाव सुमन असल्याचे सांगितले. तसेच मुलाचे नाव व गाव मंचर असल्याचे सुद्धा सांगितले.
दरम्यान उपचारनंतर सुमन बरी झाल्यानंतर स्वाती डिंबळे यांनी सेवाभावी कार्यकर्ते उमेश सोनवणे व आश्रमातील सह कार्यांच्या मदतीने तिला मंचर गावी आणले परंतु मंचर मध्ये आल्या नंतर तिचा मुलगा, पती व परिवारातील कोणीही तेथे राहत नसल्याचे दिसून आले. दरम्यान येथून ते जुन्नर येथील आर्वी गावात राहत असल्याची माहिती मिळाली. दिवसभर उन्हातानात सुमनच्या घरचा शोध घेत अखेर सांयकाळी तिचं घर सापडले. सुमन आश्रमात सात महिने राहिली परंतु घरी पोहोचल्या नंतर ती तब्बल दहा वर्षापासून मनोरुग्ण अवस्थेत घर सोडून गेली असल्याची माहिती मिळाली.
''तब्बल दहा वर्षांनंतर सुमन कुटुंबात परतल्या तिला तिचा परिवार मिळाला आणि सात महिन्यांपासूनचा आमचा शोध थांबला. मनोरुग्ण लोकांना मनोरुग्ण अवस्थेत फक्त घरात ठेवण्यापेक्षा त्यांच्यावर वैद्यकीय उपचार केल्यास ते बरे होऊ शकतात. मनोरुग्ण व्यक्तीच्या कुटुंबियांनी त्यांची वेळीच सहानुभूती पूर्वक दखल घेणे आवश्यक आहे असे स्वाती डिंबळे (संचालिका, हेल्पिंग हॅन्ड सोशल फाऊंडेशन, संचलित आसरा अनाथांचा हक्काचा निवारा यांनी सांगितले.''