शहरं
Join us  
Trending Stories
1
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
2
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
3
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
4
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण
5
दिल्लीला मिळाल्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री! आतिशी यांच्यासह आणखी ५ मंत्र्यांनी घेतली शपथ
6
काँग्रेस नेते राजभवनावर, घेतली राज्यपाल राधाकृष्णन यांची भेट; पण नेमके कारण काय?
7
जिंकलंस मित्रा! वकील बनून लढला स्वत:च्या किडनॅपिंगची केस, १७ वर्षांनंतर ८ गुन्हेगारांना शिक्षा
8
ENG vs AUS : WHAT A BALL! स्टीव्ह स्मिथ 'क्लिन बोल्ड', ऑस्ट्रेलियन दिग्गजाचाही विश्वास बसेना
9
"म्यानमारमधून ९०० कुकी अतिरेकी मणिपूरमध्ये घुसले", सुरक्षा सल्लागारांनी दिला दुजोरा, चिंता वाढली
10
58 कर्मचाऱ्यांशी शारीरिक संबंध अन्...! कोण आहे चीनची ही 'सुंदर गव्हर्नर'? ठोठावण्यात आली 13 वर्षांची शिक्षा
11
“ज्याच्या जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री हे सूत्र मविआत नाही”; संजय राऊत स्पष्टच बोलले
12
हवाई दल प्रमुखपदी एअर मार्शल अमरप्रीत सिंग यांची नियुक्ती; जाणून घ्या, त्यांच्याविषयी...
13
"या तीन घराण्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये दहशत पसरवली" अमित शाहांचा विरोधकांवर हल्लाबोल
14
भारतात WANTED असलेला फरार इस्लामिक धर्मगुरू झाकिर नाईक पाकिस्तानात 'पाहुणा'
15
IND vs BAN, 1st Test Day 3 Stumps : वेळेआधी थांबला खेळ; ढगाळ वातावरणातही चित्र एकदम स्पष्ट
16
बाबो! इन्स्टावर सूत जुळलं, एकमेकांवर प्रेम जडलं; पंक्चरवाल्यासाठी नवऱ्याला सोडलं अन्...
17
लेडीज टॉयलेटमध्ये कॅमेरा लावला; मुलीने रंगेहाथ पकडला, विद्यार्थ्याला अटक, अनेक व्हिडीओ सापडले
18
ऐश्वर्या-करीश्मादेखील वाचवू शकले नाहीत सुपरस्टारच्या मुलाचं करिअर, आता इंडस्ट्रीतून आहे गायब
19
मोठी बातमी: विधानसभेसाठी वंचितचा धमाका; ११ उमेदवारांची पहिली यादी जाहीर
20
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; विहिरी, शेततळे, वीज जोडणीसाठीच्या अनुदानात वाढ

दबाव टाकणारा आमदारही दोषी! आयुक्त म्हणाले, 'राजकीय दबावाला बळी पडणार नाही, cctv चेक करणार...'

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2024 1:30 PM

बड्या बिल्डरच्या मुलाने भरधाव वेगाने आलिशान पोर्शे कार भरधाव वेगात चालवत दुचाकीला धडक दिल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाला....

पुणे : शनिवारी शहरातील कल्याणी नगर परिसरात शनिवारी मध्यरात्री भीषण अपघात झाला. बड्या बिल्डरच्या मुलाने भरधाव वेगाने आलिशान पोर्शे कार भरधाव वेगात चालवत दुचाकीला धडक दिल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाला. अनिस अवधिया आणि अश्विनी कोस्टा (रा. मध्य प्रदेश) अशी मृत्यूमुखी पडलेल्या दोघांची नावे आहेत.

याप्रकरणी अल्पवयीन मुलाच्या बापावर मुलाला चारचाकी वाहन दिल्याप्रकरणी तसेच मुंढवा येथील कोझी आणि ब्लॅक पबच्या व्यवस्थापनासह मॅनेजरवर अल्पवयीन मुलांना दारू पुरवल्या प्रकरणी बाल न्याय कायद्याच्या कलम ७५ आणि ७७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली. शनिवारी (ता. १८) मध्यरात्री अडीचच्या सुमारास कल्याणी नगर जंक्शन, येरवडा येथे हा प्रकार घडला.

नियमानुसार या गंभीर प्रकरणामध्ये भरधाव वेगाने वाहन चालवणारा तो बड्या बापाचा अल्पवयीन मुलगा, त्याचे पालक हे मुख्य जबाबदार आहेतच. मात्र, याशिवाय विनाक्रमांकाची कार देणारा संबंधित शोरूमचा मालक, पोलिस प्रशासन, आरटीओ आणि हे प्रकरण दाबण्यासाठी पोलिसांवर दबाव टाकणारा ‘तो’ आमदारदेखील दोषी आहे. या प्रकरणावर बोलताना पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पोलिसांवर कार्यवाहीवर दबाव टाकणाऱ्या 'त्या' आमदारालाही कारवाईचा इशारा दिला आहे.

मुलगा दारू पिऊन गाडी चालवत होता -

यावेळी पोलीस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले, आरोपी अल्पवयीन असल्याने त्याला जामीन मिळाला. मात्र आम्ही याविरोधात सत्र न्यायालयात याचिका दाखल करणार आहोत. मुलाचे वडील आणि त्याला दारु देणाऱ्या पब मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कल्याणी नगर, कोरेगाव पार्क भागातील पब आणि बारवर कारवाई करण्यासाठी एक्साईज डिपार्टमेंटसोबत काम करण्यात येईल. या प्रकरणात कोणालाही वाचवण्यात येणार नाही. विनानंबर प्लेट गाडी देणाऱ्या डिलरवरदेखील कारवाई करण्यात येईल. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलिस आयुक्तांकडे सोपविण्यात आला आहे. या प्रकरणात पोलिस ठाण्यातील सीसीटीव्ही फुटेजचाही तपास करण्यात येईल. कोणी राजकीय दबाव आणला का हे यातून समजेल, असं म्हणत पोलिसांवर दबाव आणणाऱ्या 'त्या' आमदारालाही आयुक्तांनी बजावले. पुढे ते म्हणाले, या प्रकरणात कोझी बार आणि ब्लॅक बार या दोन बार चालकांवर कारवाई करण्यात येईल. हा मुलगा खरच अल्पवयीन आहे का याचा तपास त्याच्या शाळेत जाऊन करण्यात येतोय. मुलगा दारु पिऊन गाडी चालवत होता हे स्पष्ट आहे.

अधिक माहितीनुसार, फिर्यादी अकिब आणि त्याचे मित्र कल्याणी नगर परिसरातील बॉलर पबमध्ये पार्टी करून घरी परतत होते. त्याचवेळी कल्याणीनगर-एअरपोर्ट रोडवर नंबर प्लेट नसलेल्या एका आलिशान कारने दुचाकीला (एमएच १४ सी क्यू ३६२२) पाठीमागून जोरात धडक दिली. ही धडक इतकी जोरात होती की दुचाकीवरील अनिस अवधिया आणि अश्विनी कोस्टा दूरवर फेकले गेले. रस्त्यावर जोरात आपटल्याने दोघांचाही जागीच मृत्यू झाला.

दरम्यान, दुचाकीला धडक दिल्यानंतर बड्या बापाच्या मुलाने अपघातग्रस्त चारचाकी घेऊन पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र काही नागरिकांनी त्यांची दुचाकी अडवून चालकाला बाहेर काढत जबर चोप दिला. येरवडा पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलिस करत आहेत.

प्रकरण दाबण्याचा प्रयत्न..

अपघातानंतर लगेचच बिल्डर असलेल्या अल्पवयीन आरोपीच्या बापाने एका आमदारामार्फत हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला. आपल्या मुलाऐवजी दुसरा व्यक्ती गाडी चालवत होता, हे त्याला दाखवायचे होते. मात्र, प्रत्यक्षदर्शींमुळे त्याचा हा प्रयत्न फसला.

विनानंबरची गाडी रस्त्यावर आलीच कशी..

नवीन वाहन विकत घेताना नंबर प्लेट लावल्याशिवाय शोरूमच्या मालकाला ग्राहकाला गाडी देणे हा गुन्हा आहे. असे असताना एवढी महागडी कार नंबरप्लेटशिवाय ज्या शोरूमकडून देण्यात आली, त्या शोरूमच्या मालकावरदेखील गुन्हा दाखल होणे गरजेचे आहे. आरटीओ प्रशासनाकडून एरवी सर्वसामान्यांसाठी नियमांची सरबत्ती लावली जात असताना, पैशांच्या जोरावर अशा बड्या लोकांसाठी सगळे नियम धाब्यावर बसवून गाडी दिलीच कशी गेली हा देखील प्रश्न उपस्थित होत आहे.

अल्पवयीन मुलाच्या बापावर गुन्हा दाखल..

संबंधित अल्पवयीन मुलाच्या बापासह अल्पवयीन मुलाला मद्य पुरवणाऱ्या संबंधित पबच्या व्यवस्थापनासह मॅनेजरवर कलम ७५ आणि ७७ नुसार रविवारी रात्री उशीरा गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र, हा गुन्हा दाखल होण्यासाठी एवढा वेळ का लागला पोलिसांवर कुणाचा दबाव होता हे प्रश्न मात्र अनुत्तरीतच आहेत.

ठरवून दिलेल्या वेळेनंतरही पब सुरू...?

कल्याणीनगर, विमाननगर, मिल्स परिसरात असंख्य पब आहेत. दर शनिवारी आणि रविवारी या ठिकाणी मद्यपान करण्यासाठी मोठ्या प्रमाणात तरुण-तरुणी येत असतात. नियमानुसार मध्यरात्री दीड नंतर कोणताही पब सुरू ठेवणे हा देखील गुन्हा आहे. गेल्या महिन्यातच बॉलर पबवर दीडनंतरही पब सुरू ठेवल्याप्रकरणी दंडात्मक कारवाई करण्यात आली होती. असे असताना दीडनंतर या परिसरातील काही पब सुरू असतात, असा आरोप तेथील रहिवासी करत आहेत. यावर पोलिस आयुक्त आता यावर नेमकी काय कारवाई करणार हा प्रश्न पुणेकर विचारत आहेत.

यात नेमके दोषी कोण-कोण?

नियमानुसार या गंभीर प्रकरणामध्ये भरधाव वेगाने वाहन चालवणारा तो बड्या बापाचा अल्पवयीन मुलगा, त्याचे पालक हे मुख्य जबाबदार आहेतच. मात्र, याशिवाय विनाक्रमांकाची कार देणारा संबंधित शोरूमचा मालक, पोलिस प्रशासन, आरटीओ आणि हे प्रकरण दाबण्यासाठी पोलिसांवर दबाव टाकणारा ‘तो’ आमदारदेखील दोषी आहे. आता पोलिस नेमके कुणा-कुणावर कारवाई करणार आणि गेलेल्या दोन जिवांना कसा न्याय मिळणार, हा प्रश्न अनुत्तरित आहे.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीDrunk And Driveड्रंक अँड ड्राइव्हPune Porsche Accidentपुणे पोर्श अपघात