पुणे : पोटच्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या बापाला न्यायालयाने जन्मठेप आणि आठ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. सत्र न्यायाधीश एस. पी. पोंक्षे यांनी हा निकाल दिला. आंबेगाव परिसरात एक जानेवारी २०१८ ला हा प्रकार घडला होता. घरात कोणी नसल्याचा फायदा घेत त्याने मुलीवर अत्याचार केला होता. हा प्रकार मुलीने घरातील इतर सदस्यांना सांगितल्यानंतर उघडकीस आला होता. त्यानुसार तिच्या वडिलांवर भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तत्कालिक पोलिस उपनिरीक्षक ए. आर. पाटील यांनी या गुन्ह्याचा तपास केला. खटल्याचे कामकाज सरकारी वकील शुभांगी देशमुख, ॲड. विद्या विभूते आणि ॲड. सुचित्रा नरोटे यांनी पाहिले. न्यायालयीन पैरवी अधिकारी पोलिस उपनिरीक्षक रमेश चौधरी होते. न्यायालयीन अंमलदार पोलिस हवालदार एस. पी. शिंदे आणि व्ही. एस. मदने होते.
पोटच्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधम बापाला जन्मठेप
By नम्रता फडणीस | Updated: February 15, 2024 14:25 IST