कारखान्याला नोटीस या कारवाईला राजकीय स्वरूप देऊ नये; अजित पवारांची प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2023 11:00 AM2023-10-02T11:00:04+5:302023-10-02T11:01:14+5:30

आमच्याही अनेक संस्थांना नोटीस आल्या आहेत. पंकजा मुंडे यांच्या कारखान्याला देखील नोटीस आली, नोटीस देणारी यंत्रणा त्यांचं ते काम करत असते

The notice to the factory should not politicize the action Ajit Pawar reaction | कारखान्याला नोटीस या कारवाईला राजकीय स्वरूप देऊ नये; अजित पवारांची प्रतिक्रिया

कारखान्याला नोटीस या कारवाईला राजकीय स्वरूप देऊ नये; अजित पवारांची प्रतिक्रिया

googlenewsNext

बारामती : कोणतीही कारवाई कधी कोणी जाणूनबुजून करत नाही. मागच्या वर्षी श्रीनिवास पवार यांच्या कारखान्यालादेखील नोटीस आली होती. आमच्याही अनेक संस्थांना नोटीस आल्या आहेत. पंकजा मुंडे यांच्या कारखान्याला देखील नोटीस आली. नोटीस देणारी यंत्रणा त्यांचं ते काम करत असते. नोटीसला उत्तर दिलं तर तो प्रश्न संपून जातो. त्याला राजकीय स्वरूप कोणी देऊ नये, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती ॲग्रोवरील कारवाईबाबत प्रतिक्रिया व्यक्त केली.

बारामती येथे पत्रकारांशी बोलताना पवार म्हणाले, वर्षा बंगल्यावर मी मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस बसलो होतो. आम्ही वेगवेगळ्या पक्षाचे आहोत. राज्यात वेगवेगळे प्रश्न असतात. त्यामुळे आम्ही त्यावर एकत्र बसून चर्चा केली. कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने आम्ही चर्चा केली. गणपती झाले, ईद झाली. आता छटपूजा आली. त्यामुळे त्यावर बसून चर्चा केली.

सुप्रिया सुळे यांच्याविरोधात लोकसभेला सुनेत्रा पवार राहणार याबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर पवार यांनी पत्रकारांना ‘हे तुमच्याकडूनच ऐकलं आहे’ अशी मोजक्या शब्दात प्रतिक्रिया व्यक्त केली.छगन भुजबळ आणि माझ्यात वाद झाले हे धादांत खोटे असल्याचे पवार म्हणाले.

‘रिझनेबल टोल’ असावा

 काही वर्षांनंतर टोल वाढविला जातो. तर टोल वसूल झाल्यानंतर टोल बंद केला जातो. हा टोल कोणाचा याची माहिती मी घेईन. लोकांना चांगली सोय व्हावी, यासाठी ‘रिझनेबल टोल’ असावा, या मताचा मी आहे.

शेतकऱ्यांना फसवायचे धाडस झाले नाही पाहिजे

 कोणत्याही शेतकऱ्यांची बियाण्यात फसवणूक होऊ नये. शेतकऱ्यांची बियाण्यात फसवणूक होऊ नये, यासाठी आपण कायदे कडक करत आहोत. यामुळे कोणाचेही शेतकऱ्यांना फसवायचे धाडस झाले नाही पाहिजे. असे पवार यांनी यावेळी सांगितले.

Web Title: The notice to the factory should not politicize the action Ajit Pawar reaction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.