पुणे : पुणे शहरात कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात येत असल्याचे दिलासादायक चित्र दिसू लागले आहे. मागील आठवड्यापासून रुग्णसंख्येत लक्षणीय घट होऊ लागली आहे. सोमवारी २ हजार ५९३ कोरोना चाचण्या पार पडल्या. त्यापैैकी १३२ रुग्णांमध्ये कोरोनाचे निदान झाले, तर दिवसभरात २२६ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. शहरातील सक्रिय रुग्णांची संख्या २ हजार ८२ इतकी झाली आहे.
शहरात सोमवारी एका कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला. सध्या ११९ रुग्ण ऑक्सिजनवर उपचार घेत आहेत. तर १८ रुग्ण इनव्हॅजिव्ह व्हेंटिलेटरवर आणि १२ रुग्ण नॅान इनव्हॅजिव्ह व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत. आजपर्यंत पुण्यात ४४ लाख ५५ हजार ६३७ कोरोना चाचण्या झाल्या. त्यापैैकी ६ लाख ५९ हजार २६६ कोरोनाबाधितांचे निदान झाले. त्यापैकी ६ लाख ४७ हजार ८४७ रुग्ण कोरोनामुक्त झाले, तर ९३३७ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला.