बारामतीची ताकद मतपेटीतून विरोधकांना दिसेल; सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला विश्वास

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2022 07:40 PM2022-08-23T19:40:49+5:302022-08-23T19:40:58+5:30

विश्वासाच्या जोरावरच लोकनेते शरद पवार, अजित पवार आणि मी स्वतः आम्ही सामाजिक बांधिलकीतून बारामती लोकसभा मतदार संघात विकासाचे कामे केली

The opposition will see Baramati strength through the election Supriya Sule expressed faith | बारामतीची ताकद मतपेटीतून विरोधकांना दिसेल; सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला विश्वास

बारामतीची ताकद मतपेटीतून विरोधकांना दिसेल; सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला विश्वास

Next

दौंड : राजकीय दृष्टिकोनातून विरोधी पक्षांनी बारामती लोकसभा मतदारसंघात निश्चित लक्ष घालावे. विरोधकांचे मी स्वागत करेल दरम्यान लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर विरोधकांना मतपेटीतून ताकद नक्की कळेल असा विश्वास खासदार सुप्रिया सुळे यांनी दौंड येथे पत्रकार परिषदेत व्यक्त केला.

सुळे म्हणाल्या, लोकशाहीत प्रत्येकाला अधिकार आणि हक्क आहे. तेव्हा बारामतीत विरोधी पक्षातील मंडळी राजकीय दृष्टिकोनातून येत असेल तर तो त्यांचा लोकशाहीतील अधिकार आहे. परंतु माझा संविधान आणि जनतेवर विश्वास आहे. आणि या विश्वासाच्या जोरावरच लोकनेते शरद पवार, अजित पवार आणि मी स्वतः आम्ही सामाजिक बांधिलकीतून बारामती लोकसभा मतदार संघात विकासाचे कामे केली आहे. त्यामुळे राजकीय पार्श्वभूमीवर  विरोधक देखील म्हणतात की विकास करायचा असेल तर तो बारामती लोकसभा मतदारसंघा सारखा झाला पाहिजे. त्यामुळे विकास कामांची शिदोरी आमच्याबरोबर असल्यामुळे आमच्या मतदारसंघात राजकीय दृष्टिकोनातून कोणीही आलं तर त्यांचा आम्ही मानसन्मानच करू मात्र  सत्ताधाऱ्यांच्या विरोधात बोललो तर ईडी कारवाईला सामोरे जावे लागले. ही सूडबुद्धीची उदाहरणे राज्यातील जनता पाहत आहे. मात्र  सुडबुद्धी जास्त काळ टिकत नसते. परिणामी येणाऱ्या कालावधीत सूडबुद्धीच्या राजकारणाचा पर्दाफाश झाल्या शिवाय राहणार नाही.

 महाआघाडीचे सरकार पाडण्यासाठी घाई केली मात्र सरकार पाडण्यासाठी इतर राज्याची मदत घ्यावी लागली ही  शोकांतिका म्हणावी लागेल . सरकार स्थापन झाल्यानंतर एक महिन्यानंतर मंत्रिमंडळाची स्थापना झाली. हे मायबाप सरकार आहे आलिया भोगासी असेच या सरकार बद्दल म्हणावे लागेल. असे शेवटी सुप्रिया सुळे म्हणाल्या

 पालकमंत्र्यां अभावे विकास ठप्प

सरकार स्थापन होऊन एक महिना झाला मात्र अद्याप पुणे जिल्ह्यासह राज्याला पालकमंत्री नाही. पालकमंत्री अभावी राज्याचा विकास ठप्प झाला आहे. पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा असताना सर्व दृष्टिकोनातून कामकाजाचे निर्णय तत्परतेने घेतले जात होते. मात्र आता पालकमंत्र्यांअभावी विकास कामाचे निर्णय प्रलंबित झालेले आहे असे सुप्रिया सुळे यांनी यावेळी सांगितले. 

Web Title: The opposition will see Baramati strength through the election Supriya Sule expressed faith

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.