विधानसभेसाठी वाढला लाडक्या बहिणींचा टक्का..!
By नितीन चौधरी | Published: November 18, 2024 08:48 AM2024-11-18T08:48:52+5:302024-11-18T08:49:41+5:30
लिंग गुणोत्तर प्रमाण ९१५ वरून पाेहाेचले ९३२ : पुरुषांच्या तुलनेत वाढले ५२ हजार ६५७ महिला मतदान
पुणे : केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार राज्यात राबविण्यात आलेल्या मतदार पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत महिला मतदारांच्या नोंदणीत मोठी वाढ झाली आहे. जिल्ह्यातही गेल्या ११ महिन्यांमध्ये ३ लाख ८७ हजार ५५९ महिला मतदारांची वाढ झाल्याचे अंतिम मतदार यादीवरून स्पष्ट होत आहे. त्या तुलनेत पुरुष मतदारांची वाढ ३ लाख ३४ हजार ९०२ इतकीच झाली आहे. महिलांची वाढ पुरुषांच्या तुलनेत ५२ हजार ६५७ ने जास्त आहे. त्यामुळेच या ११ महिन्यांत जिल्ह्याचे पुरुष महिला लिंग गुणोत्तर प्रमाणही ९१५ वरून ९३२ इतके सुधारले आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार २३ जानेवारी रोजी जिल्ह्यात ४२ लाख ४४ हजार ३१४ पुरुष, ३८ लाख ८२ हजार ०१० महिला; तर ६९५ तृतीयपंथी असे एकूण ८१ लाख २७ हजार ०१९ मतदार होते; तर ४ नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीस मतदानासाठी पात्र मतदारांची यादी प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार जिल्ह्यात ४५ लाख ७९ हजार २१६ पुरुष, ४२ लाख ६९ हजार ५६९ महिला व ८०५ तृतीयपंथी मतदार आहेत.
गेल्या ११ महिन्यांत जिल्ह्यात ३ लाख ८७ हजार ५५९ महिला मतदारांची वाढ झाली आहे. पुरुष मतदारांच्या संख्येत ३ लाख ३४ हजार ९०२ इतकी वाढ झाली आहे. त्यामुळे पुरुषांच्या तुलनेत महिला मतदारांची संख्या ५२ हजार ६५७ ने वाढली आहे. महिला मतदारांमध्ये वाढ झाल्याने प्रतिहजारी पुरुष मतदारांच्या तुलनेत महिला मतदारांचे प्रमाण ठरविणाऱ्या लिंग गुणोत्तर प्रमाण सुधारले आहे. जानेवारीत जिल्ह्यात प्रती एक हजार पुरुषांमागे ९१५ महिला होत्या; तर ३० ऑगस्टच्या यादीनुसार ते ९२५ इतके झाले व ४ नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध झालेल्या यादीनुसार हे प्रमाण सुधारून ९३२ इतके झाले आहे.
अकरा महिन्यांत वाढलेले मतदार
वयाेगट - मतदारसंख्या ११ महिन्यांपूर्वी - आता - वाढ
१८ ते १९ - ७१ हजार ५८८ - १ लाख ७८ हजार ६१५ - १ लाख ७ हजार ०२७
२० ते २९ - १३ लाख ५ हजार ९७४ - १५ लाख ६१ हजार ३५४ - २ लाख ५५ हजार ३८०