शहरं
Join us  
Trending Stories
1
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
2
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
3
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
4
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
5
ज्यांच्या बळावर मतदान, त्यांचाच हिरावला अधिकार; दोन हजार पोलिसांचे बॅलेटच आले नाहीत
6
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
7
हल्ले, मारहाणीच्या घटनांनी राजकीय वातावरण तापले; प्रचारादरम्यान काय-काय घडलं?
8
३५ हजार पोलिसांचा फौजफाटा मुंबईत सज्ज; चार हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
9
मुंबईकरांना पहाटेच भाजीपाला पोहोचणार; धान्य, मसाला, फळ मार्केट राहणार बंद
10
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे
11
मतदान शांततेत पार पाडा, जबाबदारी निभावा; पोलिस महासंचालक संजय वर्मा यांचे आवाहन
12
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
13
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
14
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
15
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
16
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
17
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
18
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
19
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
20
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'

विधानसभेसाठी वाढला लाडक्या बहिणींचा टक्का..!

By नितीन चौधरी | Published: November 18, 2024 8:48 AM

लिंग गुणोत्तर प्रमाण ९१५ वरून पाेहाेचले ९३२ : पुरुषांच्या तुलनेत वाढले ५२ हजार ६५७ महिला मतदान

पुणे : केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार राज्यात राबविण्यात आलेल्या मतदार पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत महिला मतदारांच्या नोंदणीत मोठी वाढ झाली आहे. जिल्ह्यातही गेल्या ११ महिन्यांमध्ये ३ लाख ८७ हजार ५५९ महिला मतदारांची वाढ झाल्याचे अंतिम मतदार यादीवरून स्पष्ट होत आहे. त्या तुलनेत पुरुष मतदारांची वाढ ३ लाख ३४ हजार ९०२ इतकीच झाली आहे. महिलांची वाढ पुरुषांच्या तुलनेत ५२ हजार ६५७ ने जास्त आहे. त्यामुळेच या ११ महिन्यांत जिल्ह्याचे पुरुष महिला लिंग गुणोत्तर प्रमाणही ९१५ वरून ९३२ इतके सुधारले आहे.केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार २३ जानेवारी रोजी जिल्ह्यात ४२ लाख ४४ हजार ३१४ पुरुष, ३८ लाख ८२ हजार ०१० महिला; तर ६९५ तृतीयपंथी असे एकूण ८१ लाख २७ हजार ०१९ मतदार होते; तर ४ नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीस मतदानासाठी पात्र मतदारांची यादी प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार जिल्ह्यात ४५ लाख ७९ हजार २१६ पुरुष, ४२ लाख ६९ हजार ५६९ महिला व ८०५ तृतीयपंथी मतदार आहेत.गेल्या ११ महिन्यांत जिल्ह्यात ३ लाख ८७ हजार ५५९ महिला मतदारांची वाढ झाली आहे. पुरुष मतदारांच्या संख्येत ३ लाख ३४ हजार ९०२ इतकी वाढ झाली आहे. त्यामुळे पुरुषांच्या तुलनेत महिला मतदारांची संख्या ५२ हजार ६५७ ने वाढली आहे. महिला मतदारांमध्ये वाढ झाल्याने प्रतिहजारी पुरुष मतदारांच्या तुलनेत महिला मतदारांचे प्रमाण ठरविणाऱ्या लिंग गुणोत्तर प्रमाण सुधारले आहे. जानेवारीत जिल्ह्यात प्रती एक हजार पुरुषांमागे ९१५ महिला होत्या; तर ३० ऑगस्टच्या यादीनुसार ते ९२५ इतके झाले व ४ नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध झालेल्या यादीनुसार हे प्रमाण सुधारून ९३२ इतके झाले आहे.अकरा महिन्यांत वाढलेले मतदारवयाेगट - मतदारसंख्या ११ महिन्यांपूर्वी - आता - वाढ१८ ते १९ - ७१ हजार ५८८ - १ लाख ७८ हजार ६१५ - १ लाख ७ हजार ०२७२० ते २९ - १३ लाख ५ हजार ९७४ - १५ लाख ६१ हजार ३५४ - २ लाख ५५ हजार ३८०

टॅग्स :Puneपुणेmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४BJPभाजपाladki bahin yojanaलाडकी बहीण योजनेचाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसEknath Shindeएकनाथ शिंदेAjit Pawarअजित पवार