शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पाडण्यासाठी प्रतिभाकाकी घरोघरी प्रचार करत आहेत", अजित पवार जाब विचारणार...
2
"गुंडागर्दी बस, सांगून ठेवतो तुझा हात..."; उद्धव ठाकरेंचा धनंजय महाडिकांना जाहीर इशारा
3
"इथल्या आमदारावर काय अन्याय झाला, बिल्डरांच्या कृपेने..."; राज ठाकरेंची प्रकाश सुर्वेंवर खरमरीत टीका
4
"बंद खोलीवाला मुद्दा"! "...तर यात अडीच वर्ष येतात कुठे? जे केलं ते...; शिंदेंनाही विचारून बघा", राज यांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
5
काँग्रेसच्या खासदाराची बंडखोराला साथ; मुळकही काँग्रेस उमेदवाराच्या प्रचारात!
6
जपानचा सत्ताधारी पक्ष निवडणूक हरला; तरीही शिगेरू इशिबा पुन्हा पंतप्रधान बनले, कसे?
7
अल-कायदाच्या टेरर फंडिंग नेटवर्कचा पर्दाफाश; NIA चे देशभरात अनेक ठिकाणी छापे
8
'तेव्हा' बंद खोलीत नेमकं काय घडलं? राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंच्या मर्मावरच बोट ठेवलं! केला रोखठोक सवाल
9
"माझं ग्रहमान ठीक नाही"; सुजय विखेंच्या विधानावर जयश्री थोरात म्हणाल्या, "तुमची रेसिपी चुकली"
10
“माझ्याकडून एकच गोष्ट झाली नाही अन् ती म्हणजे...”; कबुली देत राज ठाकरेंचे मोठे विधान
11
“सत्तेचा उन्माद कमी करण्यासाठी महाराष्ट्र पिंजून काढला”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
12
मी मुख्यमंत्री व्हायचे जरी म्हटले तरी वरचे मंत्रीपद जाईल; आठवलेंनी खास शैलीत केली 'इच्छा' व्यक्त...
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : भाजपाच्या 'एक हैं तो सेफ है' ला मविआचे जशास तसे प्रत्युत्तर; दिला "हम सब नेक है..." चा नारा
14
‘काँग्रेस अध्यक्ष फक्त नावाचेच हिंदू...’, खरगेंच्या 'त्या' वक्तव्यावर आचार्य प्रमोद कृष्णम संतापले
15
“बॅग तपासली म्हणून इश्यू करण्याची गरज नाही, पोलिसांचा तो अधिकार”: प्रकाश आंबेडकर
16
"महाराष्ट्रात अशांनाच मतदान करा जे..."; मुख्यमत्री शिंदे यांचं नाव घेत शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांचं मोठं विधान
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : अजित पवार म्हणाले एक लाखांच्या लीडने येणार, युगेंद्र पवारांचा पलटवार
18
शरद पवार म्हणाले जातीवाद केल्याचे उदाहरण द्या; राज ठाकरेंनी भुजबळांच नाव घेत म्हटलं, "पुणेरी पगडी..."
19
Video : भाजपची निवडणूक आयोगात धाव; राहुल गांधींविरोधात दाखल केली तक्रार, कारण...
20
वडोदराच्या IOCL रिफायनरीत स्फोटानंतर भीषण आग; बचावकार्य सुरू

पोलिसांचा हॅकरच निघाला लुटारू; पुण्याच्या पंकज घोडेची ४ वर्षांत २५० कोटींची उलाढाल 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2022 7:43 AM

खासगी कंपनीत ५० हजारांची नोकरी करणारा घोडे याने ४ वर्षांत वेगवेगळ्या कंपन्या स्थापन करून तब्बल २५० कोटींची उलाढाल केली

पुणे : आंतरराष्ट्रीय गुन्हेगार अमित भारद्वाज याच्या विरोधातील बिटकॉइन फसवणुकीच्या गुन्ह्याच्या तपासासाठी तांत्रिक सल्लागार म्हणून पोलिसांनी ज्याची मदत घेतली त्या पंकज घोडे यानेच पोलिसांची फसवणूक केली. खासगी कंपनीत ५० हजारांची नोकरी करणारा घोडे याने ४ वर्षांत वेगवेगळ्या कंपन्या स्थापन करून तब्बल २५० कोटींची उलाढाल केली. क्रिप्टो करन्सीच्या माध्यमातून त्याने मनी लाँड्रिंग केल्याची शक्यता आहे.काही वर्षांपासून तो पुणे पोलिसांच्या गळ्यातील ताईत बनला होता. त्याने आरोपींच्या वॉलेटमधून काही बिटकॉइन इतर वॉलेटला वळविल्याचेही निष्पन्न झाले आहे.आभासी चलनावर वेगवेगळ्या पोलीस दलातील अधिकाऱ्यांना  घोडे प्रशिक्षण देत असे. दिल्ली पोलिसांसाठीही त्याने प्रशिक्षणवर्ग घेतले. त्याची पोलीस आयुक्तालयात चार वर्षांपासून ऊठबस वाढली होती. तो ग्लोबल ब्लॉकचेन फाउंडेशन कंपनीचे काम करीत होता. २०१८ पासून वेगवेगळ्या कंपन्या त्याने स्थापन केल्या. त्यातील ‘ॲग्री १० एक्स’ कंपनीला मोठे यश मिळाले आहे. यात शेतकऱ्यांना मालविक्रीसाठी ऑनलाइन प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला. त्यात दीड लाख शेतकऱ्यांचा सहभाग असून, ६ हजार पुरवठादार, ४ हजार २०० ट्रेडर्स, ८२ वस्तूंची विक्री केली जाते.३ मोबाइल, २ मॅकबुक, २ टॅब जप्त पंकज घोडेकडून ३ मोबाइल, २ मॅकबुक, ३ हार्ड डिस्क, २ टॅब, २ लॅपटॉप, ४ सिडी, ६ पेनड्राइव्ह, २ मेमरी कार्ड जप्त केले असून या डेटाचे विश्लेषण केले जात आहे.  घोडे याने अगोदर आपले क्रिप्टो वॉलेट नसल्याचे सांगितले. प्रत्यक्षात त्याने अनेक वॉलेटमध्ये आरोपींचे क्रिप्टो बिटकॉइन वळविल्याचे आढळले. याचा शोध घेण्यास पोलिसांनी पासवर्डची विचारणा केली तेव्हा त्याने चुकीचा पासवर्ड दिला. त्यामुळे ते वॉलेट लॉक होण्याची शक्यता असल्याने त्याचे क्लोनिंग केले जात आहे.