पुणे/किरण शिंदे: विधान सभेचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्याविषयी वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. अजित पवार हे भाजपात जाणार अशी चर्चा जोर धरू लागली आहे. दादांसोबत राष्ट्रवादीचे काही आमदारही जाणार असल्याचे बोलले जाते. अलीकडील अजित पवारांची विधाने पाहिली असता दादा सरकारबद्दल कुठेही आक्रमक वक्तव्य करताना पाहायला मिळत नाही. त्यामुळे या चर्चांना उधाण आले आहे. या घडामोडीवर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सध्याची चर्चा आमच्या कोणाच्याही मनात सुरु नसून त्याला अजिबात महत्व नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे. ते पुरंदरला बोलत होते.
पवार म्हणाले, सध्या जी चर्चा तुमच्या मानात सुरू आहे, ती आमच्या कोणाच्या मनात सुरू नाही. या चर्चेला अजिबात महत्त्व नाही. मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षापुरत सांगू शकतो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पक्षाला कसे मजबूत करायचं याकडे लक्ष देत आहे. माझी काही बैठक नाही, आता माझा देहू ला कार्यक्रम आहे. आणि मी आज मुंबईत जाणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कृषी वंजार उत्पन्न समिती याच्या निवडणुकीकडे लक्ष देत आहेत. त्यामुळे अनेकांना जी जबाबदारी दिलेली आहे. ते त्यांच्या कामात व्यस्त आहेत. व मी माझे दौरे करत आहे. मी ज्यावेळेस एखादे वक्तव्य केलं असेल तर त्यात कोणालाही फाटे फोडण्याचा अधिकार नाही. वेणुगोपाल हे मला आणि उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी आले होते. त्यामध्ये त्यांचा असा सुरू होता की देशपातळीवर विरोधकांची एक बैठक व्हावी. आणि काही कार्यक्रम तयार करावा ही चर्चा करण्यासाठी ही बैठक होती.