पुणे: रामजी की निकली सवारीचा ठेका अन् भारत का बच्चा बच्चा जय श्रीराम बोलेगाचा जयघोष करत श्री तांबडी जोगेश्वरीच्या विसर्जन मिरवणुकीला जल्लोषात सुरुवात झाली. समर्थ ढोल ताशा पथकाने समाधान चौकात रामजी की निकली सवारी गाण्यावर ठेका धरला.
गुलाल आणि फुलांची उधळण करत जल्लोष केला. नागरिकांनीही या उत्साहात जयघोष करण्याचा आनंद लुटला. सर्वत्र जय श्रीरामचा गजर सुरू होता. सकाळी ९ वाजता जोगेश्वरी चौकातील मांडवातून गणरायाची मूर्ती पालखीत विराजमान होईल. सकाळी १०:३० वाजता टिळक पुतळा (महात्मा फुले मंडई) येथून मुख्य विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली.
शिवमुद्रा ढोल-ताशा पथक मल्हारी मार्तंड- खंडोबाचा जागर करण्यात आला. ताल ढोल-ताशा पथक कारगिल युद्धाला २५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त इंडियन आर्मीला मानवंदना देण्यात आली.