शहरं
Join us  
Trending Stories
1
"दिवट्या आमदार...", पोर्शे प्रकरणावरून सुनील टिंगरे शरद पवारांच्या 'रडार'वर!
2
देश सोडला, भारतात आली, ओळख लपवली...; एडल्ट स्टार बन्ना शेख कशी बनली रिया बर्डे?
3
अत्याचारी राक्षस पुन्हा नको, यासाठी माझी लढाई; उमेश पाटील करणार NCP ला रामराम?
4
Musheer Khan Accident: टीम इंडियाचा क्रिकेटर सर्फराज खानचा भाऊ मुशीरचा अपघात
5
Solar Eclipse 2024: सूर्यग्रहण भारतातून दिसणार नाही पण परिणाम होतो हे नक्की; जाणून घ्या उपाय!
6
काश्मीरच्या कुलगाममध्ये दहशतवाद्यांशी चकमक; 3 जवान जखमी, सर्च ऑपरेशन सुरू
7
Indira Ekadashi 2024: नोकरी व्यवसायात यशप्राप्तीसाठी आज इंदिरा एकादशीला करा 'हे' खास उपाय!
8
"मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनामागील सूत्रधार..."; नरेंद्र पाटलांचा गंभीर आरोप
9
मोबाईलमधले फोटो, टोकाचं भांडण, रक्तरंजित प्रेम; महालक्ष्मीच्या हत्येच्या रात्री नेमकं काय घडलं?
10
NCP च्या जागेवर दावा; मुलाच्या उमेदवारीसाठी माजी आमदाराची उद्धव ठाकरेंकडे मागणी
11
अदानींच्या झोळीत आली आणखी एक कंपनी; २०० कोटींना झाली डील, जाणून घ्या
12
एका घरात पाच मृतदेह! चार मुलींसह वडिलांनी संपवलं आयुष्य, कारण...
13
अभिजीत बिचुकले बिग बॉसच्या घरात, संतापून म्हणाले, 'काहीही फो़डू शकतो...'; अंकिताची दाखवली 'ही' चूक
14
गौतम अदानींना ज्यांनी तारलं, त्यांनाच अमेरिकेत बसला लाखो डॉलर्सचा दंड; कारण काय?
15
IND vs BAN : जा रे जारे पावसा! दुसऱ्या दिवसाचा बहुतांश खेळ पाहण्यात नव्हे पाण्यात जाणार?
16
त्रिग्रही बुधादित्य राजयोग: ७ राशींना अनुकूल, सरकारी कामात लाभ; उत्पन्नात वाढ, मनासारखा काळ!
17
मुंबईत ठाकरेंच्या युवासेनेचा जल्लोष; सिनेट निवडणुकीत पुन्हा एकदा १० पैकी १० विजयी
18
विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात घ्या; शिंदेसेना, अजित पवार गटाची मागणी
19
Today Daily Horoscope आजचे राशीभविष्य: विविध पातळ्यांवर यश, किर्ती व लाभासह धन प्राप्ती होईल
20
'ती माझी मुलगी आहे...', IIFA सोहळ्यावेळी आराध्याबद्दल विचारताच ऐश्वर्याचं पत्रकाराला थेट उत्तर

रेल्वे मोटरमनची जागा हुकली, प्रवाशाच्या आयुष्याची दोरी तुटली; सिंहगड एक्स्प्रेस पकडताना प्रवाशाचा मृत्यू

By विश्वास मोरे | Published: June 15, 2024 10:41 AM

नोकरी आणि व्यवसायाच्या निमित्ताने अनेक प्रवासी दररोज सिंहगड एक्स्प्रेसने मुंबई-पुणे असा प्रवास करतात. पिंपरी आणि चिंचवडमधील प्रवाशांसाठी स्वतंत्र डब्याची सोय केली आहे...

पिंपरी :पिंपरीरेल्वेस्थानकात सकाळी ६:३० वाजेची वेळ. नेहमीप्रमाणेच प्रचंड गर्दी. पुण्याहून मुंबईकडे निघालेली सिंहगड एक्स्प्रेस वेगाने फलाटावर आली. जिथे पिंपरीतील प्रवाशांसाठी डबा असतो, तिथे ट्रेन न थांबवताच मोटरमनने पुढे नेली आणि जागा पकडण्यासाठी सर्व प्रवाशांची एकच धावाधाव झाली. याचवेळी डबा पकडण्याच्या प्रयत्नात एकाचा जीव गेला. अपघातात जीव गमावलेल्या व्यक्तीचे नाव ‘फतिमल गुडेला’ नाव आहे.

नोकरी आणि व्यवसायाच्या निमित्ताने अनेक प्रवासी दररोज सिंहगड एक्स्प्रेसने मुंबई-पुणे असा प्रवास करतात. पिंपरी आणि चिंचवडमधील प्रवाशांसाठी स्वतंत्र डब्याची सोय केली आहे. मात्र, लोकसंख्येच्या आणि प्रवाशांच्या तुलनेत डब्यांची संख्या कमी आहे. त्यामुळे जागेसाठी अनेकदा प्रवाशांमध्ये वाद होतात. जागा पकडण्यासाठी प्रवाशांना मोठी कसरत करावी लागते. यामुळे अनेक अपघातही झाले आहेत.

काय घडले?

शुक्रवारी सकाळी ६:३० वाजेला पिंपरी स्थानकात गाडी वेगात आली. नियमानुसार फलाटावर गाडी येताना मोटरमनने वेगमर्यादा पाळली नाही. डबा पुढे गेला. त्यामुळे गाडी पकडण्यासाठी धावताना फतिमल गुडेला खाली पडले. ते गाडीखाली गेले. त्यावेळी गाडी थांबविण्यात आली. त्यांना तातडीने वायसीएम हॉस्पिटलमध्ये नेले. उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.

वेगाने आणली जाते ट्रेन

पिंपरी, चिंचवड व लोणावळा या स्थानकांकरिता सिंहगड एक्स्प्रेसला स्वतंत्र डबे असल्यामुळे सर्व प्रवाशांची त्यात चढण्याकरता चढाओढ असते. त्यात भर म्हणजे या स्थानकांत सिंहगड एक्स्प्रेस अत्यंत वेगात आणली जाते आणि अचानक थांबवली जाते. बऱ्याच वेळा आपल्या नियोजित जागी न थांबता ती दोन ते तीन डबे पुढे थांबते. यामुळे ऐनवेळेस प्रवाशांची प्रचंड धावपळ होते. यामध्ये प्रवासी पडून जखमी होतात, तसेच एकाच वेळी गर्दी झाल्यामुळे मोबाइल, पाकीटचोर गर्दीचा फायदा घेऊन चोऱ्या करतात. नवखे प्रवासी बऱ्याच वेळा चालती गाडी पकडण्याचा प्रयत्न करतात आणि अंदाज चुकल्यामुळे खाली पडतात. काही अंतर फरफटत जातात. नाहीतर गाडीच्या आणि फलाटामधील जागेत पडतात, असे नियमितपणे प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी सांगितले.

सावधान, कोणीतरी आपली वाट पाहतेय!

अपघातानंतर रेल्वे प्रवाशांत गुडेला यांच्या अपघाती मृत्यूची चर्चा होती. त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली, तसेच सोशल मीडियावरून भावनिक आवाहन केले गेले की, ‘माझ्या सर्व मित्रांनो, हृदयाच्या अंत:करणातून कळकळीची विनंती आहे की, आपला जीव अमूल्य, अनमोल आहे. आपल्यावर कुटुंबातील आई, वडील, मुले, बहिणी, भाऊ व इतर सर्वांची जबाबदारी आहे. त्यामुळे रोज सकाळी सिंहगड गाडी पकडताना घाई गडबड, गोंधळ अजिबात करू नका. स्वतःची व इतरांची काळजी घेऊन गाडीमध्ये प्रवेश करा.’

टॅग्स :Puneपुणेrailwayरेल्वेpimpri-acपिंपरी