पुणे: रेल्वे स्थानकाच्या एफओबीवर (फूट ओव्हर ब्रिज, पादचारी पूल) गुरुवारी सकाळी १० च्या सुमारास संजय कुमार दरोगी-शर्मा (वय २८) मनोरुग्ण चढला होता. त्यामुळे पुणे स्थानकावर गोंधळ निर्माण झाला होता.परंतु लोहमार्ग पोलिसांच्या टीमकडून रेस्क्यूद्वारे या रुग्णाला मोठ्या शितफिने खाली उतरवण्यात आले. त्यानंतर त्याला भावाकडे सुपूर्द करण्यात आले. परंतु अशा व्यक्ती रेल्वे स्थानकात कसे येतात, त्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून कोणतीच उपाययोजना केली जात नसल्यामुळे प्रवाशांकडून संताप व्यक्त करण्यात येते आहे. सकाळी रेल्वे स्थानकावर प्रवाशांची गर्दी झाली होती. त्याच वेळी मनोरुग्ण पुलावर चढल्यामुळे एकच गोंधळ उडाला होता. तसेच पादचारी पुलावर विद्युत तारा असल्यामुळे रेस्क्यू करताना अडचणी येत होत्या. परंतु लोहमार्ग पोलिसांच्या टीमने मोठ्या शिताफिने त्याला पकडण्यात आले. ही घटना नव्याने उभारण्यात आलेल्या पादचारी पुलावर घडली. या पुलाला लागूनच मेट्रोचे नवीन स्थानक आहे. त्यातून अथवा रेल्वेच्याच परिसरातून हा मनोरुग्ण वर चढला होता, अशी शंका व्यक्त केली जात आहे.
मागील काही महिन्यांपूर्वी असाच एक मनोरुग्ण एका रेल्वे गाडीवर चढला होता. त्यावेळी विद्युत तारांचा शॉक लागून त्याचा जागीच मृत्यू झाला होता. अशा मनोरुग्णांना रोखण्यासाठी रेल्वेकडून काय ठोस उपाययोजना केल्या जातात, असा सवाल रेल्वे प्रवाशांकडून केला जात आहे. सदरची कामगिरी पोलीस निरीक्षक राजेंद्र गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार सुनिल कदम, आनंद कांबळे, अनिल टेके, निलेश बिडकर, पोलीस शिपाई विकम मधे, नेमाजी केंद्रे या टीमने केले आहे. सकाळी दहाच्या सुमारास मनोरुग्ण पादचारी पुलावर चढल्याची माहिती मिळाली. त्यानंतर लोहमार्ग टीमकडून रेस्क्यूद्वारे त्या मनोरुग्णाला खाली उतरवण्यात आले. त्यानंतर त्याच्या चुलत भावाकडे सुपूर्द करण्यात आले. - राजेंद्र गायकवाड, लोहमार्ग वरीष्ठ पोलीस निरीक्षक