नितीन चाैधरीपुणे : मान्सूनने परतीचा प्रवास सुरू केला असून, राज्यात २९ सप्टेंबरनंतर चांगला पाऊस पडेल, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने व्यक्त केला आहे. मात्र, जून ते सप्टेंबर यादरम्यान राज्यात झालेल्या पावसामुळे आतापर्यंत केवळ ७१ टक्के उपयुक्त जलसाठा तयार झाला आहे. गेल्या वर्षांच्या तुलनेत हा साठा तब्बल २० टक्क्यांनी कमी आहे. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर विभागात केवळ ३५ टक्के पाणीसाठा आहे. त्यामुळे येथे शेतीच्या सिंचनासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे.
ऑगस्ट महिन्यातील पावसाच्या दीर्घ खंडानंतर सप्टेंबर महिन्यात राज्यात विविध भागात झालेल्या जाेरदार पावसाने दिलासा दिला आहे.
टँकर स्थितीराज्यातील ४४७ गावांमध्ये पाण्याचे ४९४ टँकर सुरू झाले आहेत. यावरूनच उन्हाळ्यात दुष्काळाची स्थिती कशी असेल याचे चित्र स्पष्ट होऊ शकेल.