शहरं
Join us  
Trending Stories
1
विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गट आग्रही, पण मविआ एकत्रित दावा करू शकते का? कायदा काय सांगतो?
2
भाजपचे नियोजन 'King', मायक्रो प्लानिंगच्या जोरावर पक्षाला मिळवून दिला सर्वात मोठा विजय
3
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
4
अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता CM होण्याचा आशीर्वाद, आता सांगितलं माहायुतीच्या महाविजयाचं कारण 
5
कोण आहे Priyansh Arya? ज्याच्यासाठी प्रिती झिंटानं ३० लाख ऐवजी पर्समधून काढले ३.८० कोटी
6
निकालापूर्वी राजकीय संन्यास जाहीर केला, भाजपाला मोठे यश मिळताच निर्णय बदलला; नेते म्हणाले...
7
“मविआत आमचे संख्याबळ जास्त, मला विरोधी पक्षनेता व्हायला नक्कीच आवडेल”: भास्कर जाधव
8
IPL Auction 2025 : एका डावात १० विकेट्स घेणाऱ्या MI च्या गोलंदाजाला CSK नं केलं 'करोडपती'  
9
मतमोजणीच्या आकडेवारीत घोळ? व्हायरल पोस्टचे सत्य समोर, निवडणूक अधिकारी म्हणाले...
10
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
11
“आमचे आमदार फुटणार नाहीत, ताकदीने लढणार”; ठाकरे गटाला ठाम विश्वास, शिंदे गटाला सुनावले
12
IPL Auction 2025: MS Dhoni चा 'भिडू' Mumbai Indians ने पळवला; दीपक चहरसाठी मोजले किती कोटी? जाणून घ्या
13
मी ही निवडणूक मोठ्या मताधिक्याने कसा जिंकलो..? जितेंद्र आव्हाडांनी सांगितला १ ऑगस्टपासूनचा EVM चा घटनाक्रम
14
IPL Auction 2025: भुवीसाठी MI अन् LSG यांच्यात 'बोली युद्ध'; होऊ दे खर्च म्हणत शेवटी RCB नं मारली बाजी
15
फडणवीस मुख्यमंत्री झाले तर भाजपकडे शिंदेंसाठी प्लॅन 'B'? ठरू शकतो असा फॉर्म्युला 
16
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सला इशान किशनचा पर्याय सापडला! कोण आहे त्याची जागा घेणारा रायन रिकल्टन?
17
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
18
"चांगल्या घरातल्या मुली...", मनिषा कोईरालाच्या पदार्पणावर विचारले गेले होते प्रश्न; म्हणाली...
19
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
20
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?

Pune Metro: पुणे मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याचे उदघाटन झाले खरे; पण थांबा! येथे बदलावी लागेल ‘मेट्रो’

By ऑनलाइन लोकमत | Published: August 02, 2023 9:40 AM

उदघाटनाच्या पहिल्याच दिवशी ‘लोकमत’ प्रतिनिधींनी या मार्गांचा प्रत्यक्ष अनुभव घेतल्यानंतर हे चित्र पाहायला मिळाले...

प्रज्वल रामटेके / अंकिता कोठारे

पुणे : अनेक दिवसांपासून पुणेकरांसाठी चर्चेचा विषय ठरलेल्या पुणे मेट्रोच्या दुसरा टप्प्याचे उदघाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले खरे; पण थांबा! यापुढील काळात तुम्हाला जर शिवाजीनगर ते रूबी हॉल या स्थानकावर जायचं असेल तर सिव्हिल कोर्ट या स्थानकावर तुम्हाला मेट्रो बदलावी लागणार आहे, हे तुम्हाला माहितीये का? जाणार असाल तर इथे कोणत्याही प्रकारचे दिशादर्शक नसल्याने पहिल्यांदा गेल्यावर तुमची तारांबळ उडू शकते. शिवाजीनगर येथून आल्यावर भुयारी स्थानकावर उतरावे लागते. त्यानंतर दुसरी मेट्रो बदलण्यासाठी तब्बल तीन मजले वर जावे लागते. उदघाटनाच्या पहिल्याच दिवशी ‘लोकमत’ प्रतिनिधींनी या मार्गांचा प्रत्यक्ष अनुभव घेतल्यानंतर हे चित्र पाहायला मिळाले.

लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी (दि. १ ) मेट्रोच्या दोन मार्गिकांचे उद्घाटन केले. शिवाजीनगर येथील पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर दुपारी १२:४५ मिनिटांनी मेट्रो रेल्वेला हिरवा झेंडा दाखवला. उद्घाटनानंतर लोकमतच्या प्रतिनिधींनी प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली. मात्र पहिल्याच दिवशी या मार्गांमध्ये अनेक अडचणी समोर आल्या. सिव्हिल कोर्ट येथे मेट्रो स्थानकांचा इंटरचेंज असल्याने अनेक नवीन प्रवाशांना थोडी अडचण निर्माण होत आहे. जागोजागी मार्ग दाखविण्यासाठी दिशादर्शक पाट्या आवश्यक आहेत. परंतु अशा पाट्या मेट्रो स्थानकांवर दिसत नसल्याचे पाहायला मिळाले.

ठळक मुद्दे

दुचाकी, चारचाकी आणि ओला कॅबपेक्षाही ‘मेट्रो’ स्वस्त

या प्रवासासाठी मेट्रोने दोन्ही बाजूचा टिकीट खर्च ६० रुपये आहे. तर दुचाकीने प्रवास खर्च १०० रुपये ते २०० रुपये येतो. तर चारचाकीने प्रवास केला असता ३०० रुपये इतका येतो. पीएमपीने प्रवास केल्यास २५ रुपये ते ३५ रुपये इतका खर्च येतो. मात्र ओला कॅब केली असता २४० रुपये ते २९० रुपये इतका खर्च येतो.

शिवाजीनगर ते पिंपरी चिंचवड या दरम्यान रेंज हिल आणि खडकी मेट्रो स्थानकाचे काम अपूर्ण आहे. मात्र बोपोडी, दापोडी, फुगेवाडी, कासारवाडी भोसरी (नाशिक फाटा), संत तुकाराम नगर, आणि पी.सीएमसी या स्थानकांची कामे पूर्ण झाली आहेत. परतीच्या प्रवासासाठी प्रवाशांना मेट्रो स्थानकांवरून खाली जाऊन एक्झिट करावी लागते. तर त्याच मेट्रोमध्ये परत जाण्यासाठी पुन्हा तिकिटाने एन्ट्री करावी लागते. आज गर्दी नसताना प्रवास सोयीस्कर झाला. परंतु गर्दीच्या वेळी ही गोष्ट करण्यासाठी बराच वेळ खर्च होणार आहे.

बऱ्याच प्रवाशांनी परतीची तिकिटे काढली असता त्यांना बाहेर पडताना क्यूआर कोड स्कॅन होत नाही. इतर एंट्री करतानादेखील तिकिटाचे क्यूआर कोड स्कॅन होत नाहीत. पयार्याने त्यांना दुसऱ्या मार्गाच्या फाटकातून बाहेर पडावे लागते. यामध्ये प्रवाशांचा बराच वेळ वाया जातो.

शिवाजीनगर मेट्रो स्टेशन येथे पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच या ठिकाणी अनेक सुरक्षा रक्षक नागरिकांना मार्गदर्शन करत आहेत. या ठिकाणी मेट्रोची वेळ, विना तिकीट प्रवास केल्यास दंड आकारण्यात येईल असे फलकदेखील लावण्यात आले आहे. तर प्रवाशांना स्वत: तिकीट काढता येईल अशी यंत्रणादेखील बसविण्यात आली आहे.

शिवाजीनगर मेट्रो स्टेशन ते पिंपरी चिंचवड मेट्रो स्टेशन या दोन स्थानकातील अंतर १३ किमीचे आहे. यासाठी मेट्रोने २२-२५ मिनिटे वेळ लागतो. कारने प्रवास करायला ३१ मिनिटे लागतात. दुचाकीने २९ मिनिटे, पीएमपीएल बसने ५० मिनिटे ते १ तास लागतो. शिवाजीनगर ते पिंपरी चिंचवड प्रवासादरम्यान अनेक ठिकाणी पुण्याचे नवीन आणि निसर्गरम्य दर्शन घडते. यामध्ये हिरवी झाडी आणि यामध्ये तिरंगा फडकतानाचे सुंदर दर्शन तुम्हाला अनुभवता येते.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMetroमेट्रोLokmatलोकमत