शहरं
Join us  
Trending Stories
1
"गेल्या अडीच वर्षांपूर्वी CM शिंदे यांनाही अशीच धमकी आली होती, पण...!"; उदय सामंत यांचा खळबळजनक आरोप
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : राज्यात महायुती की महाविकास आघाडी? सर्व्हेतील धक्कादायक आकडे आले समोर
3
"...तर जरांगेंचा बोलवता धनी कोण? यावर शिक्कामोर्तब होईल"; भाजप नेते प्रविण दरेकर स्पष्टच बोलले 
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: 'शरद पवारांचे नाव घेतलं की अंगावर काटा येतो, त्यांच्यावर बोलणं..."; नरहरी झिरवाळांनी स्पष्टच सांगितलं
5
राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या १० प्रचार सभा; ८ नोव्हेंबरला पहिली सभा
6
'कोणीही मतदानापासून वंचित राहू नये, साखर कारखाने २१ नोव्हेंबरनंतर सुरु करा'; सदाभाऊ खोतांनी केली मागणी
7
हिट अँड रन प्रकरणात BMW असलेल्या भाजपा नेत्याला पोलिसांनी घेतलं ताब्यात, तपास सुरू
8
लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने पप्पू यादवांना धमकावणाऱ्याला अटक; मेव्हणीचं सिम वापरुन केला प्लॅन
9
'आयाराम गयाराम' ही म्हण राजकारणात कधी आली?; आमदाराने चक्क एका दिवसात २ पक्ष बदलले
10
सुनील केदार समर्थकांच्या बंडखोरीनं मविआत संताप; ठाकरे-पवारांच्या उमेदवारांना फटका?
11
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या युवतीच्या मृत्यूचं रहस्य; फ्लॅटमध्ये आढळला मृतदेह
12
देवेंद्र फडणवीसांच्या सुरक्षेत अचानक वाढ, तपास यंत्रणा अलर्ट; नेमकं काय घडलं?
13
मराठा उमेदवारांबाबत रविवारी होणार निर्णय; अंतरवली सराटीत येण्याचे मनोज जरांगेंचे आवाहन
14
वेगवेगळ्या चकमकीत 3 दहशतवाद्यांचा खात्मा; ज्या घरात अडकले होते, त्यालाच जवानांनी लावली आग
15
Rajnath Singh : "अशी परिस्थिती येईल जेव्हा..."; दहशतवादी हल्ल्यांबाबत राजनाथ सिंह यांची मोठी भविष्यवाणी
16
IND vs NZ, 3rd Test Day 2 Stumps: दुसऱ्या दिवशी १५ विकेट्स; तिसऱ्या दिवशीच फुटणार विजयाचे फटाके?
17
केरळमध्ये ट्रॅक साफ करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ट्रेनने उडवलं; चौघांचा मृत्यू, एकाचा मृतदेह सापडेना
18
Vidhan Sabha Election: मतदान ओळखपत्र नसेल तर काळजी नको, हे १२ पुरावे चालतील; वाचा संपूर्ण लिस्ट!
19
आबांवरील टीकेनंतर नाराजी; शरद पवारांनी अजितदादांना फटकारलं, म्हणाले...
20
पवार कुटुंब एकत्र येणार? आमच्यात फक्त राजकीय मतभेद; सुनेत्रा पवारांचं मोठं विधान

वेल्हेत झालेल्या खुनाची धक्कादायक माहिती समोर; सोन्या, चांदीच्या हव्यासापोटी मित्रांनीच संपवले

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2023 1:15 PM

मृतदेह पुरावा नष्ट करण्यासाठी घराचे बांधकाम सुरु असलेल्या ठिकाणी पुरला

वेल्हे : वेल्हे तालुक्यात काही दिवसांपूर्वी शिवीगाळ केल्याच्या रागातून दोन भावांनी एका व्यक्तीचा लोखंडी रॉड, वीट आणि लोखंडी वस्तू डोक्यात मारून खून केला होता. त्यानंतर त्याचा मृतदेह पुरावा नष्ट करण्यासाठी शेतजमिनीत  पुरला होता. या प्रकरणात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. संबधित व्यक्तीकडे असणाऱ्या सोन्या चांदीच्या हव्यासापोटी हा खून केल्याचे निष्पन्न झाले आहे. वेल्हे पोलिसांनी या घटनेचा समांतर तपास करत आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. आरोपींकडून १,८३,७६, १६५/- (एक कोटी त्र्याऐंशी लाख सहयात्तर हजार एकशे पासष्ट ) रूपयाचे वे सोन्याचांदीचे दागिने व रोख रक्कमचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

या प्रकरणी वेल्हे पोलिसांनी नितीन रामभाऊ निवांगूने, विजय दत्तात्रय निवंगुने,ओमकार नितीन निवांगुणे आणि आणखी एक अशा चार जणांना ताब्यात घेतले आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की,  मृत पावलेल्या विजय काळोखे याने घरातून निघताना सोबत सोने, चांदी आणि रोख रक्कम घेऊन गेला असल्याची माहिती त्याच्या नातेवाईकांनी दिली. वेल्हे पोलिसांनी त्यानुसार घटनेचा तपास सुरू केला. या माहितीची शहानिशा करण्यासाठी पोलिसांनी नितीन नीवंगुने याला चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्यावेळी त्याने उडवा उदविची उत्तरे दिली. मात्र पोलिसांनी खाकी दाखवताच त्याने संपूर्ण घटना क्रम सांगितला.

 विजय प्रफुल्ल काळोखे हा घरी सोन्याचांदीचे दागीने व रोख रक्कम घेऊन आला होता ही माहिती त्यांना समजली. ते सोन्याचांदीचे दागिने व रोख रक्कम पाहून आरोपी याने लोभ व हव्यासापोटी त्याने संतोषनगर कात्रज येथे स्टिलच्या चिमटयाने विजय प्रफुल्ल काळोखे याचे डोक्यात तोंडावर मारून त्यास जबर जखमी करून त्याचा खुन केला. व पुरावा नष्ट व्हावा या उद्देशाने त्याचे प्रेत एलास्टीकचे बॅरलमध्ये टाकले. हा प्रेत असलेला प्लास्टीकचा बॅरल उचलून इनोव्हा कारमध्ये टाकून मौजे रानवडी ता. वेल्हे, जि. पुणे येथे आरोपी नितीन निवगुणे याचे शेतजमीन गट नं ४० मध्ये आरोपी विजय दत्तात्रय निवगुणे याचे सहायाने खड्डयात पुरले अशी माहिती त्याने दिली. त्यानुसार पोलिसांनी सर्व आरोपींना ताब्यात घेतले आहे. सोने चांदी आणि मुद्देमाल आरोपींकडून जप्त करण्यात आला आहे.

आरोपी ओंकार नितीन निवंगुणे त्याच्याकडून  रु. १,५६,००,०००/- किमतीचे एकूण २७४३ ग्राम १२० मि.ली. वजनाचे सोन्याचे विटा व दागीने तसेच २९ ग्रॅम ६८० मिली वजनाचे चांदीचे दागीने तसेच  १४,२९,७५०रुपये किमतीचे एकूण वजन २८ किलो ५९५ ग्रॅम वजनाची चांदीची भांडी व विटा व आठ लाख रूपये  ९.११.४१५ रुपये रोख रक्कम तसेच वापरलेले वाहन ४,००००० तसेच दुचाकी ३५०००  असा एकूण   १,८३,७६,१६५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. गुन्ह्याचा तपास सहा.पोलीस निरीक्षक मनोज पवार हे करीत आहेत.

सदरची कामगीरी ही पोलिस अधीक्षक अंकित गोयल,अप्पर पोलीस अधीक्षक मितेश पट्टे, उप. विभाग पोलीस अधिक्षक, हवेली विभाग हवेली भाउसाहेब ढोले पाटील यांचे मार्गदर्शनाखाली अविनाश शिळीमकर, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण सहा पोलीस निरीक्षक  मनोज पवार व पोलीस उप निरीक्षक  महेश कदम व पथकातील अंमलदार सहा फौज सुदाम बांदल, योगेश जाधव ब.नं.१५४५ पोहवा रविद्र नागटळक, पो. हवा. पंकज मोगे, पो. हवा ज्ञानदिप धिवार, पो.ना.. अजयकुमार शिंदे, पो. का. कांतीलाल कोळपे, आकाश पाटील यांनी केली आहे.

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीDeathमृत्यू