धायरी : तडीपार असतानाही पुन्हा गुन्हा करण्याच्या इराद्याने शहरात आलेल्या गुन्हेगाराला सिंहगड रस्ता पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अविनाश मनोज देवे (वय: २२ वर्षे, रा. शिवशंकर मित्र मंडळाजवळ साईनगर, खोराड वस्ती, हिंगणे खुर्द पुणे) असे या गुन्हेगाराचे नाव आहे.
सिंहगड रस्ता पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या अविनाश देवे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर याआधी गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे त्याला पुणे शहर आयुक्त परीक्षेत्र, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय व पुणे जिल्हा या हद्दीतून दोन वर्षासाठी तडीपार करण्यात आले होते. दरम्यान तडीपार असताना देखील त्याने हद्दीत येऊन गंभीर स्वरूपाचा गुन्हा केला होता. त्यामुळे पोलीस त्या गुन्ह्यात त्याचा शोध घेत होते. गुरुवारी रात्री साडे आठच्या सुमारास तो हिंगणे खुर्द येथील खोराड वस्तीमध्ये एखादा दखलपात्र गुन्हा करण्याच्या इराद्याने थांबला असल्याची खात्रीशीर माहिती पोलीस नाईक शंकर कुंभार, अंमलदार राहुल ओलेकर व पोलीस अंमलदार देवा चव्हाण यांना मिळाली. त्यांनतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश संखे व पोलीस निरीक्षक (गुन्हे) प्रमोद वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली त्याला सापळा रचून अटक करण्यात आली. ही कामगिरी पोलीस उप-आयुक्त पौर्णीमा गायकवाड, सहाय्यक पोलीस आयुक्त सुनिल पवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश संखे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) प्रमोद वाघमारे यांचे मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सचिन निकम, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आबा उतेकर, पोलीस हवालदार संजय शिंदे, शंकर कुंभार, अमेय रसाळ, विकास बांदल, अमित बोडरे, विकास पांडुळे, राहुल ओलेकर, देवा चव्हाण, शिवाजी क्षिरसागर, अमोल पाटील, अविनाश कोंडे यांच्या पथकाने केली आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक सचिन निकम हे करीत आहेत.