पुणे : तुतारीचा निनाद... हिरवळीचा साज आणि हजारो दीपमाळांनी उजळून निघालेली ‘लोकमत’ची वास्तू... अशा स्नेहमय वातावरणात ‘लोकमत’ने राैप्यमहाेत्सवी वर्षात पदार्पण केले. या घटनेचे साक्षीदार हाेत गुरुवारी (दि.२८) हजाराे वाचकांनी ‘लाेकमत’वर शुभेच्छांचा वर्षाव केला. विविध क्षेत्रांतील दिग्गज व्यक्तींनीदेखील आवर्जून उपस्थिती लावली.
गेल्या २४ वर्षांपासून पुण्यात ‘लोकमत’ची दमदार वाटचाल सुरू आहे. पुण्याचे नंबर-१ दैनिक असलेल्या ‘लोकमत’वर पुण्यातील मान्यवरांच्या मांदियाळीत शुभेच्छांचा वर्षाव झाला. ‘लोकमत’चे संपादक संजय आवटे आणि सहायक उपाध्यक्ष निनाद देसाई यांनी सर्वांच्या शुभेच्छांचा स्वीकार केला.राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, राजकीय, औद्योगिक, अशा विविध क्षेत्रांतील कर्तृत्वसंपन्न, दिग्गज मान्यवरांनी दूरध्वनीवरूनही शुभेच्छा दिल्या. सिंहगड रोडवरील लोकमत भवन गुरुवारी मान्यवरांच्या मांदियाळीने अगदी फुलून गेले होते. स्नेहीजनांच्या या मेळाव्यात उपस्थित मान्यवर विविध विषयांवर गप्पांमध्ये रंगले होते.
जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, आमदार माधुरी मिसाळ, माजी मंत्री रमेश बागवे, माजी महापौर मुरलीधर मोहोळ, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सुनील देवधर, पोलिस आयुक्त रितेश कुमार, झोन-१ चे पोलिस उपायुक्त संदीपसिंह गिल, अपर पोलिस आयुक्त (गुन्हे) रामनाथ पोकळे, अपर पोलिस आयुक्त प्रवीण पाटील, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, प्रकुलगुरू डॉ. पराग काळकर, उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळणाकर, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक अमोल येडगे, विद्यापीठाच्या परीक्षा विभागाचे संचालक डॉ. महेश काकडे, पुणे विभागीय उच्च शिक्षण सहसंचालक केशव तुपे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम, मुख्य लेखापाल अंबरीश गालिंदे, उपआयुक्त माधव जगताप, जयंत भोसेकर, सचिन इथापे, मुख्य अभियंता युवराज देशमुख, पोलिस उपआयुक्त (गुन्हे) अमोल झेंडे, प्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर, पुणे रेल्वे विभागाचे वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक डॉ. मिलिंद हिरवे, साखर आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, नोंदणी महानिरीक्षक हिरालाल सोनवणे, म्हाडाचे मुख्याधिकारी अशोक पाटील, महावितरणचे मुख्य अभियंता राजेंद्र पवार, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक संजय कदम, हवेलीचे प्रांताधिकारी असवले, पुणे वृत्तपत्र संघाचे अध्यक्ष विजय पारगे यांच्यासह विविध मान्यवर, वाचक उपस्थित हाेते.
शुभेच्छा देण्यासाठी लागली रांगच रांग
‘लोकमत’वर प्रेम करणारे असंख्य वाचक, अधिकारी, राजकीय व्यक्ती, सामाजिक कार्यकर्ते आदींनी वडगाव येथील लाेकमत भवनला प्रत्यक्ष भेट देऊन शुभेच्छांचा वर्षाव केला. शुभेच्छा देण्यासाठी अक्षरशः रांग लागली होती. त्यामुळे लोकमत भवन गुरुवारी गजबजून गेले हाेते.