पुण्याच्या सर्वांगीण विकासासाठी आघाडी कटिबद्ध; निधी कमी पडणार नाही, अजित पवारांची ग्वाही

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2022 07:44 PM2022-03-13T19:44:25+5:302022-03-13T19:44:51+5:30

पुणे शहरातील विविध विकासकामांच्या उद्घाटन आणि भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते

The state government is committed to the overall development of Pune Funds will not be reduced testifies Ajit Pawar | पुण्याच्या सर्वांगीण विकासासाठी आघाडी कटिबद्ध; निधी कमी पडणार नाही, अजित पवारांची ग्वाही

पुण्याच्या सर्वांगीण विकासासाठी आघाडी कटिबद्ध; निधी कमी पडणार नाही, अजित पवारांची ग्वाही

Next

पुणे : पुणे शहर, पिंपरी-चिंचवडसह जिल्ह्यातील विविध भागात पायाभूत सुविधा निर्माण करुन नागरिकांना उत्तम सोई-सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी अर्थसंकल्पात भरीव तरतूद केली आहे. पुण्याचा सर्वांगिण विकास करण्यासाठी राज्य शासन कटीबद्ध आहे. विकासासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी दिली.

पुणे शहरातील विविध विकासकामांच्या उद्घाटन आणि भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, आमदार चेतन तुपे उपस्थित होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सूस गाव येथील नाला व रस्ता रूंदीकरणाच्या कामाचे, वारजे माळवाडी येथील क्रीडा संकुल व क्लब हाऊसचे, शिवणे येथील शिवणे-नांदेड पूल, सुखसागर नगर येथील डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम क्रीडा संकुल, पोलीस चौकी, राजमाता अहिल्यादेवी होळकर बहुउद्देशीय महिला बचत गट सभागृह, कै. किसनराव कदम उद्यान, महादेवनगर येथील ७० लक्ष लिटर पिण्याच्या पाण्याची टाकीचे, मिठानगर, कोंढवा खुर्द येथे माँ खदीजा (र.अ.) प्रसुतिगृह, हजरत अब्दुल रहेमान (रहे) ओटा मार्केटसह विविध विकास कामांचे लोकार्पण, उदघाटन आणि भूमिपूजन करण्यात आले.

पवार म्हणाले, सर्वसामान्य नागरिक केंदबिंदू मानून अर्थसंकल्पाच्या माध्यमातून उत्तम सोई-सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी अर्थसंकल्पाच्या माध्यमातून कृषी, सार्वजनिक आरोग्य, मुनष्यबळ विकास, दळणवळण आणि उद्योग या पंचसुत्री कार्यक्रमाची अंमलबजावणी करुन मानवी जीवनमान उंचविण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहे. नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी अर्थसंकल्पात राज्यासह पुण्यासाठी निधीची भरीव तरतूद केलेली आहे.

मेट्रोच्या विविध मार्गांचा विस्तृत प्रकल्प अहवालाचे काम सुरू

सुशिक्षित युवक-युवतींच्या कौशल्यात वाढ करुन रोजगारक्षम मनुष्यबळ निर्मितीसाठी प्रत्येक महसुली विभागात एक इनोव्हेशन हब स्थापन करण्यासाठी निधी उपलब्ध करुन देण्यात येईल. पुण्यातील स्वारगेट ते कात्रज या मार्गावर मेट्रो प्रकल्प प्रस्तावित आहे. पिंपरी ते निगडी, वनाझ ते चांदणी चौक, रामवाडी ते वाघोली, स्वारगेट ते हडपसर, हडपसर ते खराडी, खडकवासला ते स्वारगेट या जोड मार्गिकांचा विस्तृत प्रकल्प अहवाल तयार करण्यात येत आहे.

Web Title: The state government is committed to the overall development of Pune Funds will not be reduced testifies Ajit Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.