पुणे: मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वातील आमरण उपोषण... मराठा आरक्षणाचा कायदेशीर लढा न्यायालयात सुरू असला तरी सरकारने अधिक जागृत होऊन समाजातील मुलांना न्याय द्यावा, त्यांची परिस्थिती समजून घ्यावी आणि आरक्षणाचा निर्णय लवकरात लवकर घ्यावा, अशा मागणीसाठी मनोज जरांगे यांनी मागच्या वर्षीपासून आंदोलन पुकारलं आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जरांगे पाटील यांनी मुंबईपर्यंत पदयात्रा काढली आहे. लाखोंचा जमाव घेऊन ते मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. यावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. या सरकारला आरक्षण द्यायचं नाही. ते मराठा आणि ओबीसी समाजात भांडण लावत आहेत असा आरोप पटोले यांनी केले आहे.
पटोले म्हणाले, मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन हे सरकारचं पाप आहे. विरोधी पक्षात असताना देवेंद्र फडणवीस सांगत होते की, राज्य सरकारला आरक्षण देण्याचे अधिकार आहेत त्यांनी करावं. आता का देत नाहीत मराठा समाजाला आरक्षण? असा सवाल पटोले यांनी उपस्थित केला आहे. ते म्हणाले, या सरकारला आरक्षण द्यायचच नाहीये. तुमच्या कडे पाशवी बहुमत आहे. तरीही का देत नाही आरक्षण? हे केवळ आरक्षणाच राजकारण करत असल्याचे असल्याचे पटोले यांनी सांगितले आहे.
हे येड्यांचं सरकार
आरक्षणाचा प्रश तातडीने सोडवावा. आज जनगणना केली जात नाही. हे मुद्दाम जनगणना करत नाहीत. तुम्हाला गरिबांच काहीच पडलं नाही. काल राम मंदिर सोहळ्याला देखील सगळे श्रीमंत लोक होते. राम तर गरिबांचा होता. हे लोकांना येड समजतात. हे येड्यांचं सरकार आहे. मराठा आणि ओबीसी वाद हे निर्माण करत आहेत.