पुणे : राज्यात पुढील पाच दिवस हवामान कोरडे राहणार असून, उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे ४८ तासांमध्ये किमान तापमानात घट होण्याची शक्यता आहे. परिणामी थंडीचा कडाका जाणवू शकतो. पुण्यात किमान तापमान १५.२ होते. सकाळी गारठा जाणवत असून, दुपारी देखील हवेत गारवा आहे. येत्या दोन दिवसांत थंडीचा कडाका जाणवेल, असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे.
सध्या राज्यामध्ये किमान तापमानात घट झाल्यामुळे थंडी वाढण्यास सुरुवात झाली आहे. उत्तरेकडून थंड वारे वाहत आहेत. ते महाराष्ट्राकडे येत असल्याने थंडीत भर पडत आहे. तसेच राज्यात काही भागात ढगाळ हवामानही आहे. राज्यामधील अनेक ठिकाणी किमान तापमानात घट पहायला मिळत आहे. विदर्भातील अनेक जिल्ह्यातील किमान तापमान ९ अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले आहे. मंगळवारी नागपूर, गोंदिया, यवतमाळ येथील किमान तापमान ९ अंश सेल्सिअस होते. उत्तर भारतातील बहुतांशी भागात थंडीचा कडाका कायम आहे.
ख्रिसमसला (दि.२५) हवेतील गारवा कमी होणार असून, किमान तापमानात वाढ होणार आहे, अशी माहिती हवामान खात्याने दिली आहे.
पुण्यातील किमान तापमानपाषाण १३.४
हवेली : १४.०शिवाजीनगर : १५.२
कोरेगाव पार्क : १९.२मगरपट्टा : १९.४
वडगावशेरी : १९.४