शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
2
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
3
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
4
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
5
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
6
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
8
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
9
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
10
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
11
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
12
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
13
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
14
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
15
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
16
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
17
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
18
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
20
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी

पुण्यात MPSC विरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी सोडलं

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2024 7:28 PM

एमपीएससी विद्यार्थ्यांची एक मागणी पूर्ण केली तर कृषी विभागासंबंधित मागणीचा काहीच विचार न केल्याने विद्यार्थ्यांनी आंदोलनावर ठाम राहिले होते

पुणे: पुण्यात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विरोधात विद्यार्थ्यांचे मागील दोन दिवसांपासून आंदोलन सुरु होते. राज्य सेवा संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेऊन सरकारने त्यांची एक मागणी पूर्ण केली. कृषी विभागाने नुकतेच २५८ पदे एमपीएससीकडे भरतीसाठी वर्ग केली आहेत. २०२४ च्या जाहिरातीत ही पदे समाविष्ट करावीत आणि पूर्वपरीक्षा घ्यावी अशा मागणीसाठी विद्यार्थी पुन्हा आंदोलनावर ठाम राहिले होते. अशातच पुणेपोलिससांकडून विदयार्थ्यांना धरपकड झाली. त्यांना ताब्यात घेण्यात आले होते. सर्व आंदोलक विदयार्थी आणि कार्यकर्त्यांना पोलिसांनी सोडलं आहे. एकूण सहा जणांना नोटीस आणि समज देण्यात आला आहे. 

आंदोलकांची मागणी शासनाने मान्य केली आहे. त्यानंतर त्यांनी उपोषण सोडलं होत. आता मुलं पुन्हा पुन्हा आंदोलनाला बसत आहेत. आम्ही वारंवार विनंती करूनही ते ऐकत नसल्याने आम्ही त्यांना ताब्यात घेतलं असल्याचे पोलिसांनी सांगितलं होत. अखेर त्यांना समाज आणि नोटीस देऊन सोडण्यात आलं आहे. 

या आंदोलनाला काल राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार रोहित पवार, तसंच काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांनी भेट देत पाठिंबा दिला होता. रोहित पवार हे रात्रभर विद्यार्थ्यांसोबत आंदोलनात सहभागी होते. तसंच राज्य सरकारने या आंदोलनावर तोडगा न काढल्यास मी देखील या आंदोलनात सहभागी होणार असल्याचा इशारा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिला होता. तसेच आज सायंकाळपर्यंत रोहित पवार विद्यार्थ्यांबरोबरच होते.  

टॅग्स :PuneपुणेMPSC examएमपीएससी परीक्षाStudentविद्यार्थीEducationशिक्षणagitationआंदोलनPoliceपोलिस