शहरं
Join us  
Trending Stories
1
हात बदलेगा हालात.. जम्मू काश्मीरसाठी काँग्रेसचा जाहीरनामा; महिला, युवांसाठी विशेष आश्वासने
2
"...तर ना आइस्क्रीम खाता आलं असतं, ना बाइक चालवता आली असती"; अमित शाह यांचा राहुल गांधींवर निशाणा
3
'हा' देश मुस्लिमांना देश सोडण्यासाठी देणार लाखो रुपये, काय आहे प्रकरण? जाणून घ्या
4
मावस भावाच्या अत्याचारातून अल्पवयीन बहीण प्रसूत; वाई तालुक्यातील धक्कादायक घटना
5
VIDEO : अंबरनाथमध्ये दुचाकीस्वाराला डंपरने उडवलं, घटना सीसीटीव्हीत कैद
6
वंदे भारतची नागपूरला तिसरी दिमाखदार भेट; सिकंदराबादकडे रवाना; ३ तासांत गाठले बल्लारशाह
7
राहुल गांधींवर वादग्रस्त वक्तव्य भोवलं, शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल
8
"राहुल गांधींचे शिक्षक..."; भगवंत मान यांचं काँग्रेस नेत्याच्या शिक्षणावर भाष्य करत मोठं विधान
9
"तर कायदेशीर कारवाई करेन", सलमान खानची इन्स्टाग्रामवर ऑफिशियल पोस्ट, प्रकरण काय?
10
VIDEO: वंदे भारताला हिरवा झेंडा दाखवण्यासाठी बाचाबाची, भाजप आमदार ट्रेनसमोर पडल्या
11
Chirag Paswan : "मी कोणालाच घाबरत नाही..."; पंतप्रधान मोदींसोबतच्या नात्याबद्दल चिराग पासवान यांचा खुलासा
12
माझी प्रचंड खिल्ली उडवली गेली, पण मी गप्प राहिलो; कारण..., पंतप्रधान मोदी स्पष्टच बोलले
13
'फक्त 5 तासांचा कार्यक्रम, 10 दिवस काय केले?' BJP नेत्याची राहुल गांधींच्या US दौऱ्यावर टीका
14
Shikhar Dhawan Video: गब्बर इज बॅक!! निवृत्तीनंतर पुन्हा एकदा शिखर धवनच्या हाती बॅट, केली तुफान फटकेबाजी
15
CM शिंदे दक्ष, नाराजांवर लक्ष! विधानसभेआधी तीन नेत्यांचे राजकीय पुनर्वसन
16
"बासरीने काम चालणार नाही, सुदर्शन चक्र..."; असं का म्हणाले योगी आदित्यनाथ? कुणाचं नाव घेतलं?
17
Rohit Sharma Virat Kohli, IND vs BAN 1st Test: विराटचा केवळ २ गोलंदाजांसह सराव, रोहितचा तर वेगळाच प्लॅन! दिग्गजांच्या डोक्यात नक्की काय?
18
मुख्यमंत्र्यांनी शब्द पाळला, लोकसभेत तिकीट कापलेल्या हेमंत पाटलांना मंत्रिपदाचा दर्जा
19
Suraj Chavan : गुलीगत फेम सूरज चव्हाणला मिळणार मैत्रीण... फळ्यावर हार्ट इमोजी, त्यात कोरलंय S; 'ती' कोण?
20
भाजपाने युती धर्म पाळला असता, तर शिंदेंचे चार खासदार वाढले असते -बच्चू कडू

नांदेड सिटीत वाहनचालकाचा थरार! महिला गंभीर जखमी, २ ते ३ वाहनांना धडक; चालक पोलिसांच्या ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2024 1:24 PM

नांदेड सिटीतील डीसी मॉलजवळ वाहनावरील ताबा सुटल्याने चालकाने समोर असलेल्या दुचाकीवरील महिलेला धडक दिली, तसेच आणखी दोन ते तीन वाहनांना जोराची धडक दिली

धायरी: सिंहगड रस्ता परिसरातील नांदेड सिटी येथे एका चारचाकी वाहनचालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने समोर असलेल्या एका दुचाकीला तसेच दोन इतर चारचाकी वाहनांना जोराची धडक दिली. यात एक महिला  गंभीर जखमी झाली असून हा अपघात सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास नांदेड सिटीतील डीसी मॉलजवळ घडला. याप्रकरणी संतोष शिवाजी गायकवाड (सध्या राहणार : धायरी, पुणे) या चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाहनचालक संतोष गायकवाड हे शिक्षक असून ते आपल्या चारचारकी वाहनाने मावळ येथे असणाऱ्या शाळेत निघाले होते. दरम्यान नांदेड सिटीतील डीसी मॉलजवळ आल्यानंतर त्यांचा वाहनावरील ताबा सुटल्याने त्यांनी समोर असलेल्या दुचाकीवरील महिलेला धडक दिली. तसेच आणखी दोन ते तीन वाहनांना जोराची धडक दिली. यात दुचाकीवरील महिला गंभीर जखमी झाली. अपघात झाल्यानंतर जमलेल्या जमावाने वाहनचालक गायकवाड यांना जबर मारहाण केली. घटनेची माहिती मिळताच हवेली पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन आरोपीला ताब्यात घेतले असून वैद्यकीय चाचणीसाठी व उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले आहे. पुढील तपास हवेली पोलीस करीत आहेत.

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीAccidentअपघातbikeबाईकcarकारWomenमहिलाhospitalहॉस्पिटल