शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

सायकल खेळताना तोल गेल्याने कालव्यात पडून बहिण-भावाचा दुर्दैवी मृत्यू; हवेली तालुक्यातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2022 10:40 AM

सोरतापवाडी परिसरात या घटनेने शोककळा पसरली

लोणी काळभोर : सायकल खेळत असताना तोल गेल्याने कालव्यात पडून अल्पवयीन बहिण -भाऊ बुडून मृत्यूमुखी पडले असल्याची दुर्दैवी घटना सोरतापवाडी (ता.हवेली ) येथे सोमवार (१८ एप्रिल) रोजी सायंकाळी पावणे सात वाजण्याच्या सुमारास घडली आहे. 

जागृती दत्तात्रय ढवळे (वय ६ ) व शिवराज दत्तात्रय ढवळे (वय ३ रा. सोरतापवाडी, ता. हवेली, मूळ गांव -देऊळगाव , ता.परंडा ,जि. उस्मानाबाद ) असे मृत्यूमुखी पडलेल्या भावंडाची नावे आहे. जागृती आणि शिवराय हे दोघे सायकलवर बसून कालव्यावरील भरावावर खेळत होते. जागृती सायकल चालवत होती. तर शिवराज पाठीमागच्या सिटवर बसला होता. खेळत असताना जागृतीचा तोल गेला. त्यामुळे सायकलसह दोघा कालव्यात पडले. मुले घरी आली नाही म्हणून आसपासच्या परिसरात पाहणी केली असता कालव्यात सायकल तसेच चपला आढळून आल्याने ही बालके कालव्यात पडल्याचे निदर्शनात आले. त्यामुळे एकच गोंधळ उडाला. ग्रामस्थांनी तात्काळ शोधमोहीम सुरू केली.

स्थानिक युवकांनी कालव्यात उतरून सुमारे दोन - तीन किलोमीटर कालव्याचे पात्र तपासले. मात्र अतिदाबाने आवर्तन सोडल्याने पाण्याचा प्रवाह अधिक असल्याने मुलांचा शोध घेणे अवघड जात होते. शोधमोहीम सुरू असताना दोन ते तीन किलोमीटर अंतरावर रात्री दहा व अकरा वाजण्याच्या सुमारास दोन्ही बालके जलपर्णीत अडकल्याने निदर्शनास आले. उपचारासाठी त्यांना तात्काळ खाजगी रुग्णालयात नेण्यात आले. परंतु तत्पूर्वी  त्यांचा मृत्यू झाला होता. या घटनेत निरागस बालकांवर काळाने झडप घातल्याने ग्रामस्थ हळहळ व्यक्त करत आहेत. दोघा बहीण भावडांचा मृत्यू झाल्याने सोरतापवाडी परिसरात शोककळा पसरली आहे. 

टॅग्स :Loni Kalbhorलोणी काळभोरWaterपाणीDeathमृत्यूCyclingसायकलिंगPoliceपोलिस