उदापूर (पुणे) :शिरूर मतदारसंघातील निवडणूक ही नक्कीच सोपी नव्हती सहापैकी पाच आमदार युतीच्या बाजूने प्रचार करत होते; परंतु ही निवडणूक सर्वसामान्य जनता आणि मतदार यांनी हाती घेतल्यामुळे हा विजय मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या एकजुटीचा असल्याचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी सांगितले.
खासदार कोल्हे म्हणाले, जुन्नर तालुक्यातून ५१ हजारांचे मताधिक्य मिळाले आहे. त्यामुळे त्यांना घरवापसी करून घेण्याची गरज आहे का? असा प्रश्न आमदार अतुल बेनके यांचे नाव न घेतला उपस्थित केला. याबाबत निर्णय घेण्याचा अधिकार पक्षश्रेष्ठी व तुम्हा कार्यकर्त्यांचा आहे माझा नाही त्याचप्रमाणे शिरूर मतदारसंघातील सहा तालुक्याचे आमदार महाविकास आघाडीचेच असणार हेदेखील ठणकावून सांगितले.
प्रलंबित प्रश्न मार्गी लावा
कोपरे, मांडवे, मुथाळणे, जांभूळशी या आदिवासी परिसरात एमआय टॅंक होणे गरजेचे आहे पिंपळगाव परिसरात बुडीत बंधारे होणे, धरणामुळे विस्थापित झालेली गावे यांचे पुनर्वसन करणे, कालव्यातून होत असलेली पाणीगळती, पाण्यापासून वंचित गावे उपसा, सिंचन, खंत औषधांवरील असणारी जीएसटी बंद करणे, तरुणांना रोजगार मिळविण्यासाठी प्रयत्न करणे, धरणांचे प्रश्न, बुडीत बंधारे, बिबट्याचे प्रश्न, आदिवासी शेतकऱ्यांसाठी तांदूळ महोत्सव असे अनेक प्रश्नांवर आवाज उठविण्याचे काम आपण संसदेत करून हे प्रश्न कायमचे मार्गी लावावे, अशी मागणी उपस्थित कार्यकर्त्यांनी केली.
पिंपळगाव जोगा जिल्हा परिषद गटातील मतदार आभार मेळाव्यात बोलत ते होते, जि. प. माजी सदस्य अंकुश आमले, पंकज हांडे, ताराचंद जगताप, शीतल फोडसे, हर्षदा हांडे, नामदेव नाडेकर, नितीन घोलप, धनंजय बटवाल, सुधीर डोंगरे, बाळासाहेब भोर, विक्रम गावडे, स्वप्नील आहिनवे, माऊली खंडागळे, अंकुश आमले, शरद लेंडे, मंदाकिनी दांगट, माउली खंडागळे, शरद लेंडे, तुषार थोरात, अंकुश आमले, मोहित ढमाले, सुरज वाजगे, पांडुरंग शिंदे, प्रभाकर शिंदे, जालिंदर पानसरे, जयवंत शेरकर, राहुल सुकाळे, प्रकाश कुलवडे, पुष्पलता शिंदे, शांताराम वारे, विविध गावांचे सरपंच, उपसरपंच सर्व सदस्य, महाविकास आघाडीचे नेते पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.