शहरं
Join us  
Trending Stories
1
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
2
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
3
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
4
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
5
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
6
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
7
'डिजिटल अरेस्ट' च्या जाळ्यात अडकली, ३३ लाखांची आरटीजीएसही करायला बँकेती गेली; मॅनेजरच्या लक्षात आले...
8
विमानात अमेरिकन महिलेचा श्वास गुदमरू लागला, देवदूत बनून धावली काँग्रेसची महिला नेता आणि वाचवले प्राण   
9
रेपो रेट कपातीनंतरही FD वर बंपर रिटर्न! SBI मध्ये २ लाख जमा करून मिळेल ८३,६५२ रुपये निश्चित व्याज
10
टेक इंडस्ट्री हादरली! AI मुळे २०२५ मध्ये १.२० लाख नोकऱ्या संपुष्टात; कर्मचारी कपातीत कोणती कंपनी पुढे?
Daily Top 2Weekly Top 5

पीएमपीची चाके फिरू लागली उलटी! प्रवासी अन् उत्पन्नही घटले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2024 13:04 IST

गतवर्षीच्या तुलनेत यंदा २३ कोटी ४० लाखांची घसरण

पुणे :पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) उत्पन्न आणि प्रवासी संख्येत यंदा गतवर्षीच्या तुलनेत घसरण झाली आहे. नोव्हेंबरअखेर २३ कोटी ४० लाख इतके उत्पन्न कमी झाले आहे. परिणामी यंदा संचलन तूट वाढण्याची शक्यता आहे.पीएमपीकडून पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पीएमआरडीए हद्दीत प्रवासी सेवा दिली जाते. दैनंदिन १९४५ बसमधून दिवसाला ११ ते १२ लाख प्रवासी प्रवास करतात. यामध्ये पीएमपीच्या स्वमालकीच्या १००४ आणि खासगी ९४१ बस धावतात. यातून दैनंदिन एक कोटीपेक्षा जास्त उत्पन्न मिळते; परंतु हे उत्पन्न खर्चाच्या तुलनेत कमी आहे. त्यामुळे दिवसेंदिवस पीएमपीचे आर्थिक घट जास्त होत आहे.पीएमपी प्रशासनाकडून उत्पन्नवाढीसाठी अनेक उपाययोजना करत आहेत. उत्पन्नाचे उद्दिष्ट साध्य होताना दिसत आहे; परंतु मागील दोन अध्यक्षांनी उत्पन्नवाढीसाठी प्रत्यक्ष मार्गावर फिरून आढावा घेत तोट्यात असलेले काही मार्ग बंद केले होते. त्याचा परिणाम उत्पन्नवाढीवर झाला होता. तसेच लांब पल्ल्याच्या तोट्यातील मार्ग बंद करून ज्या मार्गांवर जादा उत्पन्न आहे, अशा मार्गांवर गाड्या सोडण्यात आल्या. त्याचा फायदा ‘पीएमपीएमएल’ला झाला होता.पीएमआरडीए हद्दीतील प्रवासाचा फटकापुणे महानगर परिवहन महामंडळाकडून ‘पीएमआरडीए’च्या हद्दीत १२२ मार्गांवर ५०२ बसद्वारे सेवा दिली जाते. या हद्दीत अनेक लांब पल्ल्याचे मार्ग आहेत. त्यामुळे बस संचलनासाठी पीएमपीला मोठा खर्च येतो. त्यामुळे तत्कालीन ‘पीएमपी’चे अध्यक्ष ओमप्रकाश बकोरिया यांनी ‘पीएमआरडीए’च्या हद्दीतील मार्ग बंद केले होते; परंतु, पुण्याच्या पालकमंत्र्यांनी पीएमपी अध्यक्षांची भेट घेऊन संचलन तुटीचे पैसे पीएमपीला ‘पीएमआरडीए’कडून देण्याचे आश्वासन दिले होते. त्यासाठी पीएमआरडीएच्या आयुक्तांना पीएमपीच्या संचालक मंडळातही समाविष्ट करून घेतले. त्यामुळे उत्पन्नात घट होत आहे.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रPMPMLपीएमपीएमएलPublic Transportसार्वजनिक वाहतूकSwargateस्वारगेटBus Driverबसचालकpassengerप्रवासी