फक्त कणा नव्हे, सर्व शरीर मजबुत असावे; महसूल विभागाला अजित पवारांची सूचना
By रोशन मोरे | Published: August 1, 2023 08:53 PM2023-08-01T20:53:23+5:302023-08-01T20:54:01+5:30
शासनाची प्रतिमा उंचावण्यासाठी महसूल विभागाने नेहमीच अग्रेसर राहणे आवश्यक
पुणे : महसूल विभाग हा प्रशासनाचा कणा आहे. फक्त कणा मजबूत असून चालणार नाही तर संपूर्ण शरीर मजबूत असावे लागते. त्यासाठी कृषी, आरोग्य, सिंचन, जलसंपदा, सहकार यासह अन्य सर्व विभागांना एकत्र घेऊन काम करावे. महसूल सप्ताह महसूल विभागापुरता मर्यादित न ठेवता सर्व विभागांना सहभागी करुन यशस्वी करावा आणि सप्ताहाच्या निमित्ताने सर्वसामान्य नागरिकांची कामे गतीने पूर्ण करावीत, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
विधानभवन येथे विभागीय आयुक्तालयातून राज्यस्तरीय महसूल दिन व महसूल सप्ताहाचा शुभारंभ तसेच सर्व विभागीय आयुक्त व सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी दूरदृष्यप्रणालीद्वारे संवाद कार्यक्रमात पवार बोलत होते. यावेळी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, महसूल व वन विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. राजगोपाल देवरा, विभागीय आयुक्त सौरभ राव, राज्याचे जमाबंदी आयुक्त एन. के. सुधांशू, नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक हिरालाल सोनवणे आदी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, अधिकाऱ्यांनी प्रशासनाची कामगिरी उत्तम होईल यासाठी प्रयत्न करावेत. प्रशासकीय व्यवस्था अधिक गतीमान करण्याचे काम करताना परस्पर समन्वय ठेवावा. नागरिकांची कामे वेळेत करण्यासोबत जनकल्याणकारी योजना जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवून लोकाभिमूख काम करावे. शासनाची प्रतिमा उंचावण्यासाठी महसूल विभागाने नेहमीच अग्रेसर राहणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले.
प्रास्ताविकात देवरा यांनी महसूल सप्ताहाच्या आयोजनाचे महत्व सांगून या सप्ताहाची रुपरेषा विषद केली. तर आभार व्यक्त करताना विभागीय आयुक्त श्री. राव यांनी महसूल सप्ताहानिमित्त राबविण्यात येणारे उपक्रम पुढील वर्षभर त्याच पद्धतीने राबविले जातील अशी ग्वाही दिली. यावेळी राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, सर्व जिल्हाधिकारी दूरदृष्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते. तसेच जिल्ह्यातील सर्व महसूल अधिकारी, कर्मचारी कार्यक्रमास उपस्थित होते.
महसूल विभाग अधिक लोकाभिमुख करु
महसूलमंत्री विखे पाटील म्हणाले, राज्यात प्रथमच महसूल सप्ताहाचे आयोजन होत आहे. महसूल विभाग अधिक लोकाभिमुख करण्याचा हा एक प्रयत्न‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमामध्ये महसूल विभागाचे चांगले योगदान आहे. समाजातील प्रत्येक घटक या उपक्रमामध्ये सहभागी निकांना न्याय देण्याचे काम व्हावे.