किरण शिंदे
पुणे : मूळचा पुणेकर पण मागील काही वर्षांपासून ते अमेरिकेत सेटल झालेले. काही महिन्यांपूर्वी ते दिवाळीनिमित्त पुण्यात आले होते. लक्ष्मी रस्त्यावरील प्रसिद्ध सोन्या-चांदीच्या दुकानात खरेदीला गेले होते. मात्र दुकानातील मॅनेजरने वापरलेले शब्द त्याच्या जिव्हारी लागले. आणि त्यानंतर त्यांनी देशभरातील दीड लाख टॉयलेट एका क्लिकवर आणलेत. नेमकं काय झालं होतं. आणि या तरुणाने असं केलं तरी काय?
अमोल भिंगे. मूळचे पुणेकर असलेली ही व्यक्ती मागील काही वर्षापासून नोकरीनिमित्त अमेरिकेत स्थायिक झाले आहेत. काही महिन्यापूर्वी ते दिवाळीनिमित्त पुण्यात आले होते. दिवाळीच्या खरेदीसाठी ते लक्ष्मी रस्त्यावरील एका सराफाच्या दुकानात गेले होते. खरेदी झाल्यानंतर दुकानातील टॉयलेट वापरण्यासाठी ते गेले होते. मात्र अत्यंत घाणेरडे आणि दुर्गंधीयुक्त असलेले हे टॉयलेट पाहून ते तसेच बाहेर परत आले. याविषयी त्यांनी दुकानाच्या मॅनेजरकडे तक्रार केली. मात्र मॅनेजरने यावरून त्यांच्याशीच हुज्जत घातली. यावेळी मॅनेजरने वापरलेले काही शब्द त्यांच्या चांगलेचं जिव्हारी लागले.
मात्र अमोल भिंगे जेव्हा बाहेर आले तेव्हा जी अडचण आपल्याला आली ती अनेकांना येत असेलच असा प्रश्न त्यांना पडला. त्यामुळे यावर उपाय म्हणून टेक्नॉलॉजीच्या मदतीने काही करता येईल का याच्या विचारात ते होते. आणि यातूनच टॉयलेट सेवा या ॲपचा शुभारंभ झाला. या माध्यमातून त्यांनी देशभरातील दीड लाख टॉयलेटची माहिती एका क्लिकवर आणून ठेवल.
पहा काय म्हणतात अमोल भिंगे...