लोणी काळभोर : वडकी (ता. हवेली) गावाच्या हद्दीत असलेल्या एका गोडावूनचे शटर उचकटून अज्ञात चोरट्यांनी तब्बल ७ लाख रुपयांच्या वेगवेगळ्या क्षमतेच्या १३४ विद्युत मोटारी चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे.या चोरीप्रकरणी गोडावूनचे व्यवस्थापक नागेश अर्जुन झेंडे (वय ३०, रा. उरुळी देवाची, ता. हवेली, मूळ गाव घुसार्ळी टकळी, ता. पंढरपूर, जि. सोलापूर ) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. १० फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ ते ११ फेब्रुवारी रोजी सकाळी ८:३० दरम्यान ही घटना घडली. वडकी गावाच्या हद्दीत दत्त मंदिरानजिक भूषण रवींद्र कोठडिया यांच्या मालकीचे केबीआर पंपचे गोडावून आहे. व्यवस्थापक झेंडे यांनी शनिवार आणि १० फेब्रुवारी रोजी नेहमीप्रमाणे गोडावून उघडून दिवसभर ट्रानस्पोर्टची कामे केली. सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास गोडावून बंद केल्यानंतर रविवारी सुट्टी असल्याने ते आपल्या गावी गेले. ११ फेब्रुवारी रोजी त्यांना ओळखत असलेले आदिनाथ जरेकर यांनी फोनवरून संपर्क साधला व गोडावूनचे शटर उचकटून असल्याचे सांगितले. झेंडे तेथे पोहोचले नंतर त्यांनी पाहणी केली असता त्यांना एक व अर्धा हॉर्स पॉवर क्षमतेच्या केबीआर कंपनीच्या ४ लाख रुपये किमतीच्या ११२ नवीन विद्युत मोटारी आणि तीन हॉर्स पॉवर क्षमतेच्या केबीआर कंपनीच्या ३ लाख रुपये किमतीच्या २२ नवीन पाण्यातील सबमर्शियल विद्युत मोटारी अशा एकूण ७ लाख रुपये किमतीच्या एकूण १३४ पाण्याचा मोटारी अज्ञात चोरट्यांनी शटर उचकटून चोरून नेल्याचे निदर्शनास आले. या प्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक बी. ए. कोंडूभैरी यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार विलास प्रधान करत आहेत.
वडकीत गोडावूनचे शटर उचकटून तब्बल ७ लाख रुपयांच्या विद्युत मोटारींची चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2018 1:15 PM
वडकी (ता. हवेली) गावाच्या हद्दीत असलेल्या एका गोडावूनचे शटर उचकटून अज्ञात चोरट्यांनी तब्बल ७ लाख रुपयांच्या वेगवेगळ्या क्षमतेच्या १३४ विद्युत मोटारी चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे.
ठळक मुद्दे१० फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ ते ११ फेब्रुवारी रोजी सकाळी ८:३० दरम्यान घडली घटना७ लाख रुपये किमतीच्या एकूण १३४ पाण्याचा मोटारींची चोरी