-
राजुगुरुनगर येथून मोटारसायकलची चोरी
खेड : राजगुरुनगर येथील खेड-तिन्हेवाडी रस्त्यावरी अजित वाळुंज यांच्या घरासमोर रस्त्यावर लावलेली मोटारसायकल चोरट्यांनी लंपास केली. ही घटना १८ जानेवारी रोजी घडली. याप्रकरणी संदीप मदन चतरकर (वरा चांडोली, ता. खेड) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस निरीक्षक गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरु आहे.
---
राक्षेवाडीत मोटारसायकलची चोरी
खेड : राक्षेवाडी (ता. खेड) येथील शेतकरी शिवाजी गुलाब सांडभोर यांनी त्यांच्या घरासमोर लॉक करून ठेवलेली मोटारसायकल चोरट्याने पळवली. ही घटना १७ जानेवारी रोजी रात्रीच्या सुमारास घडली. याबाबत शिवाजी सांडभोर यांनी पोलिसात तक्रार दिली असून, त्यानुसार खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.
--
टाकळी भीमात मोटारसायकलची चोरी
शिक्रापूर : टाकळी भीमा घोलपवाडी (ता. शिरूर) येथील रहिवासी प्रकाश काळुराज घोलप यांनी त्यांच्या घरासमोर लॉक करून ठेवलेली मोटारसायकल चोरट्याने लंपास केली. ही घटना १९ जानेवारी रोजी सायंकाळी घडली. याबाबत प्रकाश घोलप यांनी फिर्याद दिली असून, शिक्रापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस निरीक्षक तावसकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.
--
कारेगावात दोन मोटारसायकलची चोरी
रांजणगाव : कारेगाव (ता. शिरूर) येथील एका नागनाथ तुकाराम जाधव यांच्या खोलीसमोरील लॉक करून ठेवलेली मोटारसायकल (एमएच १२, एस आर ०४९१) चोरट्याने लंपास केली. ही घटना १६ जानेवारी रोजी रात्रीच्या सुमारास घडली. याबाबत निखिल मच्छींद्र महाजन यांनी फिर्याद दिली. दुसऱ्या घटनेत अक्षय अंबर पवार यांची मोटारसायकलही (एमएच ४२, एपी३५०१) त्याच रात्री कारेगावातून चोरट्यांनी लंपास केली. अक्षय पवार यांनीही २० जानेवारी रोजी फिर्याद दिली. त्यानुसार रांजणगाव पोलीस ठाण्यात दोन्ही गुन्हे दाखल झाले आहेत. पोलीस निरीक्षक राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरु आहे.
--
गोपाळवाडीत मोटारसायकलची चोरी
दौंड : गोपाळवाडी (ता. दौंड) येथे किसन बाळू होले यांच्या घरासमोर लाॅक करून ठेवलेली मोटारसायकल (एमएच ४२, ए पी ५३०१) चोरट्यांनी चोरून नेली. ही घटना १० जानेवारी रोजी रात्रीच्या सुमारास घडली. याबाबत किसन होले यांनी फिर्याद दिली. त्यानुसार दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. पोलीस निरीक्षक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरु आहे.
--
खोडदमधून मोटारसायकलची चोरी
खोडद : खोडद अमरवाडी येथील कांदा साठवणीच्या बॅरेकजवळ लावलेली मोटारसायकल (एमएच १४, इजे ८३८९) चोरट्यांने चोरून नेली. ही घटना १५ जानेवारी रोजी रात्रीच्या सुमारास घडली. याबाबत रामदास नजू पोखरकर यांनी फिर्याद दिली. त्यानुसार नारायणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सहायक पोलीस निरीक्षक गुंड यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.
--
बारामतीत मोटारसायकलची चोरी
बारामती : बारामती येथील सुभद्रा मॅालच्यासमोरील सर्व्हिस रस्त्याच्या कडेला लावलेली मोटारसायकल (एम एच ४२, एजे ८२३२) चोरट्याने लंपास केली. ही घटना १६ जानेवारी रोजी सायंकाळच्या सुमारास घडली. याबाबत सचिन दिलीप देवकाते यांनी फिर्याद दिली. त्यानुसार बारामती तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस निरीक्षक ढवाण यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरु आहे.
--