मंचर पोलिसांत याविषयी अजित निघोट यांनी तक्रार दाखल केली आहे. यावर्षी परिसरात अपेक्षित पाऊस पडला नाही. आता तर कडक ऊन पडू लागले आहे. यावर्षी पाऊस कमी त्यात मालाला बाजारभाव नाही. अशा दुहेरी कात्रीत शेतकरी सापडला असून या केबलचोरीमुळे शेतकऱ्यांचे हजारो रुपयांचे नुकसान झाले. मोटारी बंद राहिल्याने उभी पिके जळून चालली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांत संतापाचे वातावरण पसरले आहे. या केबल चोरांचा पोलिसांनी त्वरित छडा लावावा अशी मागणी शेतकरी दादाभाऊ दैने, शैलेश बाणखेले, सचिन निघोट ,राजेंद्र बाणखेले, सुभाष निघोट, वसंत निघोट आदी शेतकऱ्यांनी केली आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक सतीश होडगर यांच्या मार्गदर्शनाखाली बीट अंमलदार आढारी हे करत आहेत.
आंबेगाव तालुक्यातील वडगाव काशिंबेग येथील आठ शेतकऱ्यांच्या इलेक्ट्रिक मोटारींच्या केबल चोरट्यांनी चोरून नेल्या आहेत.