शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
4
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
5
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
8
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
9
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
10
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
11
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
12
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
13
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
14
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
15
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
16
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
17
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
18
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
19
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल

‘माळेगाव’ च्या साखर कारखान्याच्या कार्यालयातुन 'प्रमोशन ऑर्डर फाईल' ची चोरी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2020 9:23 PM

माळेगाव साखर कारखाना या घटनेमुळे चांगलाच चर्चेत

ठळक मुद्देकार्यकारी संचालकांची पोलीस ठाण्यात धाव

बारामती : राज्याच्या राजकारणात चर्चेचा विषय असणारा माळेगाव साखर कारखाना आज एका घटनेमुळे चांगलाच चर्चेत आला आहे. कारखान्याच्या कार्यालयातुन चक्क 'प्रमोशन ऑर्डर फाईल' ची चोरी झाली आहे.यानंतर कार्यकारी संचालकांनी बारामती ग्रामीण पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदविली आहे.पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,याप्रकरणी कार्यकारी संचालक विजय मुकुटराव वाबळे (वय ६५ वर्ष) यांनी ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार ४ मार्च ते ६ एप्रिल दरम्यान हा प्रकार घडला आहे. अज्ञात आरोपी १ ते ३१ कामगारांपैकी कोणीतरी एक असल्याचे फिर्यादीत नमुद करण्यात आले आहे. माळेगाव सहकारी साखर कारखाना प्रशासकीय इमारती  मधीलकपाटातून 'प्रमोशन  ऑर्डर फाईल' चोरून नेल्या आहेत. मुद्दाम लबाडीच्या इराद्याने चोरी करून चोरून नेल्याचे देखील फिर्यादीत नमुद करण्यात आले आहे.दरम्यान,माळेगांव कारखान्याच्या निवडणुकीत सत्तापालट झाल्यानंतर ७ एप्रिल रोजी बाळासाहेब तावरे ,तानाजी कोकरे यांनी अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाचाकार्यभार स्वीकारला.या पार्श्वभुमीवर गुरुवारी(दि २७) ग्रामीण पोलीसठाण्यात झालेल्या तक्रारीवरुन नव्या जुन्या संचालकांमध्ये आरोप-प्रत्यारोप रंगण्याची चिन्हे आहेत.

टॅग्स :BaramatiबारामतीSugar factoryसाखर कारखानेPoliticsराजकारणtheftचोरी