शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
2
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
3
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
4
मणिपूरच्या असह्य वेदना; बिरेन सिंह सरकारबद्दल निर्णय घेण्याची गरज!
5
लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला
6
तिकडे डोनाल्ड ट्रम्प.. आणि इकडे नरेंद्र मोदी
7
आमदार प्रताप अडसड यांच्या भगिनीवर चाकूहल्ला; तर जळगावात उमेदवारावर गोळीबार
8
तिकडे ते गोड, इकडे नावडते असे का?, राहुल गांधी यांना विनोद तावडेंचा सवाल; काँग्रेस नेते-अदानींचे दाखवले फोटो
9
...मग सत्ताधारी कोणासाठी राज्य चालवतात?; शरद पवार यांचा सवाल
10
Maharashtra Election 2024: पैशांचा बाजार! २०१९च्या तुलनेत पाचपट रक्कम जप्त
11
काँग्रेसची आश्वासने  निवडणुकीपुरतीच; देवेंद्र फडणवीस यांचा सोयाबीन भावावरून पलटवार
12
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
13
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
14
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
15
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
16
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
17
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
18
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
19
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
20
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल

पत्नीच्या प्रतिज्ञापत्रामुळे त्यांची मुक्तता

By admin | Published: April 21, 2017 5:59 AM

जुन्नर पंचायत समितीचे माजी सभापती देवेंद्र खंडे यांनी पत्नीला मारहाण केल्याप्रकरणी पोलिसांनी खंडे यांचेवर कारवाई केल्यानंतर त्यांची पत्नी रूपाली खंडे

नारायणगाव : जुन्नर पंचायत समितीचे माजी सभापती देवेंद्र खंडे यांनी पत्नीला मारहाण केल्याप्रकरणी पोलिसांनी खंडे यांचेवर कारवाई केल्यानंतर त्यांची पत्नी रूपाली खंडे यांनी न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करून पुरवणी जबाबातील माहिती खोटी असल्याचे म्हटल्याने या मारहाण प्रकरणाला वेगळी कलाटणी मिळाली आहे. पत्नीच्या प्रतिज्ञापत्रामुळे न्यायालयाने खंडे यांचा जामीन मंजूर केला असून खंडे यांची जामिनावर मुक्तता झाली आहे़, अशी माहिती खंडे यांचे वकील अ‍ॅड़ चंद्रकांत डहाळे यांनी दिली़जेवण थंड दिले, या कारणावरून देवेंद्र खंडे यांनी पत्नी रूपाली हिला जबर मारहाण केल्याने त्यांचे दोन दात पडले होते. खंडे यांनी जबरदस्तीने स्वत:चे पाय धुवून चार ग्लास पाणी पिण्यास भाग पाडले होते. या क्रुर वागणुकीमुळे त्यांच्या पत्नीने नारायणगाव पोलीस ठाण्यात दि़ २ एप्रिल २०१७ रोजी फिर्याद दिली होती़ त्यानुसार नारायणगाव पोलिसांनी खंडे यांचेवर गुन्हा दाखल केला होता़ त्यानंतर दि़ ३ एप्रिल २०१७ रोजी पुरवणी जबाब देऊन पती खंडे यांनी लोखंडी सळईने तोंडावर मारहाण केल्यामुळे दोन दात पडून जबडा फ्रॅक्चर झाल्याचे म्हटले होते़ आधी पोलिसांनी भादंवि ३२५ अन्वये गुन्हा दाखल केला होता़ पुरवणी जबाबानंतर पोलिसांनी भादंवि ३२६ अन्वये वाढीव कलम लाऊन खंडे यांना अटक केली होती़ न्यायालयाने खंडे यांना पोलीस कोठडी दिल्याने त्यांची रवानगी येरवडा कारागृहात झाली होती़ १७ एप्रिल २०१७ रोजी रूपाली खंडे या जुन्नर न्यायालयात हजर झाल्या व प्रतिज्ञापत्र देऊन पती खंडे यांनी लोखंडी सळईने मारहाण केलेली नसून जबडा फ्रॅक्चर झालेला नाही़ पोलिसांनी घेतलेला पुरवणी जबाब खोटा असून तो आपल्याला वाचून दाखविलेला नाही, असे प्रतिज्ञापत्राद्वारे न्यायालयास आपले म्हणणे सादर केले़ (वार्ताहर)