पुणे : अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील आढळगाव येथे चालू असलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या कामासाठी उत्खननाच्या परवानग्या घेतल्या का, रॉयल्टी भरली का, अशी विचार करुन कंपनीला दंडात्मक कारवाई करायची नसेल. तर २ कोटी रुपये द्यावे लागतील, नाही तर माहिती अधिकाराखाली माहिती घेऊन कोर्टात दावा दाखल करु. अशी धमकी देणार्या माहिती अधिकार कार्यकत्याला खंडणी विरोधी पथकाने सापळा रचून पकडले. दत्तात्रय गुलाब राव फाळके (वय ४६, रा. मानसिंग रेसिडेन्सी, तळजाई पठार, धनकवडी) असे त्याचे नाव आहे. याप्रकरणी यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दत्तात्रय फाळके हा माहिती अधिकार कार्यकर्ता म्हणून काम करतो. त्याने फिर्यादी यांना वारंवार फोन करुन फिर्यादीच्या कंपनीचे राष्ट्रीय महामार्गाचे कामाबाबत उत्खनन करता त्याच्या परवानग्या घेतल्या का, रॉयल्टी पेमेंट केले का अशी विचारणा करुन तुमच्या कंपनीला दंडात्मक कारवाई करायची नसेल. व्यवस्थित काम करायचे असले तर तुम्हाला २ कोटी रुपये द्यावे लागतील. नाही तर तुमच्या हायवेचे कामकाजाबाबत माहिती अधिकाराखाली माहिती घेऊन कोर्टात दावा दाखल करु. तुम्हाला त्रास देणार, तुम्हाला ही जिवंत सोडणार नाही, अशी धमकी देऊन २ कोटी रुपयांची खंडणी मागितली. फिर्यादी यांनी याची तक्रार खंडणी विरोधी पथकाकडे केली. पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वारगेटकडून कात्रजकडे जाणार्या सातारा रोडवरील कात्रज येथील कदम प्लाझा येथे सापळा रचण्यात आला. वर २ हजार रुपयांची नोट ठेवून बाकी १२४६ डमी नोटांचे २ बंडल तयार करण्यात आले. २५ लाख रुपयांची बंडल देण्यासाठी तयार केले गेले. मंगळवारी दुपारी पावणेचार वाजता दत्तात्रय फाळके हा ही २५ लाखांची खंडणी घेण्यासाठी तेथे आला असताना पोलिसांनी त्याला पकडले. सहायक पोलीस निरीक्षक सजगणे तपास करीत आहेत.