पुणे : प्रकाश अांबेडकरांनी अामच्याशी अाघाडीची तयारी दर्शवली तर अाम्ही त्यांना साेबत घेऊ परंतु त्यांच्या मागण्या अवास्तव नसाव्या. परंतु ते अामच्या साेबत येतील असे वाटत नाही असे मत राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले.
लाेकमतच्या पुणे कार्यालयाला चव्हाण यांनी सदिच्छा भेट दिली, यावेळी ते बाेलत हाेते. प्रकाश अांबेडकरांच्या मागण्या अवास्तव असल्याने त्यांच्याशी अाघाडी करणे शक्य नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. परंतु मायावतींना साेबत घेण्याचा प्रयत्न निश्चित करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. चव्हाण म्हणाले, अांबेडकर अामच्यासाेबत अाले तर साेबत घेऊ, पण ते येतील असे वाटत नाही. मागच्या वेळेस त्यांना अकाेल्याची लाेकसभेची जागा देण्याची काॅंग्रेसने तयारी दर्शवली हाेती. परंतु ते वास्तविक मागण्या करत नसल्याने त्यांना साेबत घेणे शक्य नाही. कवाडे, गवळी यांनी साेबत येण्याची तयारी दर्शवली तर त्यांना साेबत घेऊ. राजू शेट्टींशी अामची निश्चित युती हाेईल.
देशात माेदींना हरविण्यासाठी सर्व विराेधी पक्षांनी एकत्र येण्याची गरज अाहे. त्यासाठी साेनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली सर्व विराेधी पक्षांचे महागठबंधन व्हावे अशी माझी इच्छा अाहे. देश वाचावायचा असेल तर भाजपाचा पराभव करावा लागेल.