पुणे : जिल्ह्यातील मतदारांची संख्या पाऊण कोटी झाली असून, त्यात ३६ लाख ६६ हजार ७४४ महिला आहेत. अजूनही २१ विधानसभा मतदारसंघात कसबा मतदारसंघामधे पुरुषांच्या तुलनेत महिला मतदारांची संख्या अधिक आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत दरहजारी पुरुष मतदारांमागे ९०० महिला होत्या. यंदा त्यात ९१२ पर्यंत वाढ झाली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात मतदार नोंदणी मोहीम घेण्यात आली. त्यात १ लाख ३७ हजार ५५० मतदारांनी नावनोंदणी केली. मे महिन्यात झालेल्या लोकसभा निवडणुकीत जिल्ह्यातील मतदारसंख्या ७५ लाख ४९ हजार ८६ होती. ऑगस्टअखेरीस ती ७६ लाख ८६ हजार ६३६ इतकी झाली आहे. बुधवार (दि. २४) पर्यंत मतदार नावनोंदणी केल्यास, विधानसभा निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. त्यामुळे मतदारसंख्येत काहीशी वाढ होऊ शकते. लोकसभेनंतर ७१,३८३ पुरुष व ६६ हजार १३३ महिला मतदारांची संख्या वाढली आहे. जिल्ह्यातील २१ मतदारसंघात मिळून ४० लाख १९ हजार ६६४ पुरुष व ३६ लाख ६६ हजार ७४४ महिला मतदार आहेत. म्हणजेच पुरुषांच्या तुलनेत ३ लाख ५२ हजार ९२० महिला मतदार कमी आहेत. भोसरी मतदारसंघात पुरुषांच्या तुलनेत महिला मतदारांची संख्या ४१,२१३ ने कमी आहे. खालोखाल चिंचवडमधे ३४,१६८ आणि खडकवासला मतदारसंघात ३१,२२८ने महिला मतदार कमी आहेत. चिंचवड मतदारसंघात सर्वाधिक ५ लाख १६ हजार ८०४ मतदार असून, पुरुष व महिला मतदारांची संख्या येथे सर्वाधिक आहे. त्यात २ लाख ७५ हजार ४८६ पुरुष व २ लाख ४१ हजार ३१८ महिला मतदार आहेत. कॅन्टोन्मेंट मतदारसंघात महिला मतदारांची संख्या सर्वात कमी आहे. कसबा मतदारसंघात २ लाख ९० हजार ४३८ मतदार आहेत. त्यापैकी १ लाख ४३ हजार ९९९ पुरुष आणि १ लाख ४६ हजार ४३९ महिला मतदार आहेत. पुरुषांच्या तुलनेत २ हजार ४४० महिला मतदार अधिक आहेत. भोसरी विधानसभा मतदारसंघात पुरुषांच्या ४१ हजार २१३ महिला मतदार कमी आहेत. खालोखाल चिंचवड व खडकवासला मतदारसंघात पुरुषांच्या तुलनेत महिला मतदारांची संख्या कमी आहे. .........
विधानसभा मतदारसंघ पुरुष- महिला
जुन्नर १,५३,६२९ १,४५,७२८
आंबेगाव १,४५,६२३ १,३७,२०८
खेड आळंदी १,७०,५१४ १,५५,९३७
शिरुर १,९८,९६९ १,८२,२४९
दौंड १,५९,१३८ १,४४,१०७
इंदापूर १,५९,३७३ १,४५,३३९
बारामती १,७६,५८७ १,६४,८०१
पुरंदर १,८८,५०७ १,७१,२९९
भोर १,८९,९८३ १,६९,५४१
मावळ १,७८,७५२ १,६६,६४५
चिंचवड २,७५,४८६ २,४१,३१८
पिंपरी १,८४,७१३ १,६६,५६७
भोसरी २,३६,८५३ १,९५,६४०
वडगावशेरी २,३७,०३१ २,१५,९३२
शिवजीनगर १,५५,१७० १,४९,७३७
कोथरुड २,१०,६७५ - १,९२,८०२
खडकवासला २,५७,४८३ २,२६,२५५
पर्वती १,८२,१७६ १,७१,६५७
हडपसर २,६५,६१९ २,३६,१९४
पुणे कॅन्टोन्मेंट १,४९,३८४ १,४१,३४९
कसबापेठ १,४३,९९९ १,४६,४३९