पुणे : बसेसचे पार्किंग, भाडेवाढ, मार्ग, वेळापत्रक, अतिरिक्त बसेस यावर कोणाचेही नियंत्रण नसते, त्यामुळे नागरिकांना निकृष्ट सेवा मिळत आहे. पीएमपीसोबत सार्वजनिक वाहतुकीमध्ये कोणीही स्पर्धक नाही, त्यामुळे पीएमपीकडून प्रवासी टिकवून ठेवण्यासाठी कोणतेही प्रयत्न केले जात नाहीत, अशी टीका वाहतूक कायद्याचे अभ्यासक रणजित गाडगीळ यांनी केली.पीएमपी प्रवासी मंचच्या वतीने आयोजित पीएमपी प्रवासी मेळाव्यात ते बोलत होते. या वेळी सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी चंद्रशेखर चव्हाण, अनिल पंतोजी, मंचाचे अध्यक्ष जुगल राठी, विवेक वेलणकर, संजय शितोळे, सतीश चितळे आदी उपस्थित होते. पीएमपीचे व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांना जिवे मारण्याच्या धमकीचे जे पत्र आले, त्याचा निषेध प्रवासी मंचातर्फे या वेळी करण्यात आला. तसेच पीएमपीकडे सर्वाधिक तक्रारी नोंदविणाºया प्रवाशांचा मोफत पास देऊन या वेळी सन्मान करण्यात आला.पीएमपी चालकांविषयी अनेक तक्रारी येतात. चालकांना यासाठी प्रशिक्षित करायला हवे. पीएमपीच्या प्रस्तावित बस पास दरवाढीसाठी सनदशीर प्रस्ताव सादर करून प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाची मान्यता घेण्यात यावी, असे पत्र प्राधिकरणाने पीएमपीएमएलला पाठविले आहे, असे चव्हाण यांनी सांगितले. बस पास स्वस्त हवेत, त्यासोबतच अतिशय सहजरीत्या प्रवाशांना पास मिळायला हवा. यामुळे जास्तीत जास्त प्रवासी सार्वजनिक वाहतुकीचा वापर करतील, असे राठी म्हणाले.>पीएमपीला टप्पा वाहतुकीसाठी जी कायदेशीर मान्यता हवी असते, ती प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाकडून घ्यावी लागते. काही फॉर्म कार्यालयाकडे भरून द्यायचे असतात. परंतु अशा प्रकारची कोणतेही कायदेशीर पूर्तता पीएमपी किंवा प्राधिकरणामार्फत केली जात नाही.- रणजित गाडगीळ
प्रवासी टिकविण्यासाठी प्रयत्न नाहीत, नागरिकांना निकृष्ट सेवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2017 12:37 AM