पुणे : राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षात फूट नाही, अजित पवार आमच्याच पक्षाचे नेते आहेत असे सांगतानाच राज्यात एक उपमुख्यमंत्री भाजपचे आहेत. दुसरे कुठले आहेत? कुठल्या पक्षाचे आहेत? मला माहिती नाही, असे राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकाराशी बोलताना सांगितले. पुणे महापालिकेत मतदारसंघातील प्रश्नासंदभाबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी त्या पत्रकारांशी बोलत होत्या. यावेळी राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, विशाल तांबे आदी उपस्थित होते.
सुप्रिया सुळे म्हणाल्या, आमचा पक्ष अजून एकच आहे. पक्ष फुटलेला नाही. एक गट सतेत्त आहे तर एक गट विरोधी पक्षात आहे. अजित पवार आमच्या पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत. त्यांच्या उत्तराची आम्ही वाट पाहत आहोत. शरद पवार आणि अजित पवार यांच्यात पुण्यात भेट झाली. उद्योगपती अतुल चोरडिया यांच्या घरात ही बैठक झाली. ही गुप्त भेट असल्याचं बोललं गेलं. त्यावर आम्ही गुप्त बैठक करत नाही. चोरडिया यांच्या घरी गुप्त बैठक का होईल?, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.
भाजपने अनेकवेळा राष्ट्रवादीला फोडण्याचे प्रयत्न केले. पण त्यांना त्यामध्ये अपयश आलं. यावेळी मात्र भाजपला ते शक्य झालं. त्यांना काहीही करुन सत्तेत यायचं आहे. साम दाम दंड भेद असं स्वत: देवेंद्र फडणवीस यांनीही म्हटलं आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार चार वेळा मुख्यमंत्री होते. राष्ट्रवादीची स्थापना झाल्यानंतर शरद पवार मुख्यमंत्री झालेले नाहीत. ते दिल्लीच्या राजकारणात आहेत.
देवेंद्र फडणवीस यांच्यावर भाजपने केला अन्याय-उपमुख्यमंत्री , भाजपचे देवेद्र फडणवीस यांनी १०५ आमदार निवडून आणले आहेत. पण ते मुख्यमंत्री झालेले नाही. त्यामुळे त्यांच्यावर भाजपने अन्याय केला आहे. त्यामुळे त्यांच्यावर मी काही बोलणार नाही असेही खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले.