पुणे : पुणे महापालिकेचा २०२३-२४चा अर्थसंकल्प आज आयुक्त विक्रम कुमार यांच्या हस्ते सादर करण्यात आला. पुणे महापालिकेचे २०२३-२४ वर्षासाठी साठी ९ हजार ५१५ कोटींचे बजेट सादर करण्यात आले. यंदाच्या अर्थसंकल्पात पुणेकरांवर कोणतीही करवाढ केली नसल्याचे बजेटमधून दिसून आले आहे. हे अर्थसंकल्प फेब्रुवारी महिन्यात सादर केले जाणार होते. कसबा विधानसभा पोटनिवडणुकीच्या आचारसंहितेमुळे हे अर्थसंकल्प सादर करता आले नाही. आज अखेर अर्थसंकल्पाला मुहूर्त लागला.
आयुक्त विक्रम कुमार यांनी पुणे महापालिकेच्या २०२२-२३चा अर्थसंकल्प ८ हजार ५९२ कोटींचे सादर केले होते. त्यामध्ये ४ हजार ८८१ कोटींची महसुली कामे, तर ३ हजार ७१० कोटी भांडवली प्रस्तावित केली होती. २०२१-२२ आयुक्तांनी ७ हजार ६५० कोटीचे अर्थसंकल्प तयार केले होते. यात हजार कोटीची वाढ केली होती. स्थायी समितीच्या अर्थसंकल्पामध्ये २२२ कोटींची वाढ आयुक्तांनी केली होती. आयुक्तांनी बजेट सादर केल्यानंतर स्थायी समिती अध्यक्षांना बजेट सादर करता आले नव्हते. त्यांचा कालावधी संपला होता. पुढे आयुक्तांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पावरच अंमलबजावणी करण्यात आली. त्यानंतर पालिका प्रशासक म्हणून आयुक्त विक्रम कुमार यांना याच पद्धतीने दुसरे अर्थसंकल्प सादर करण्याची संधी मिळाली आहे.
पुणे महानगर पालिकेचे प्रशासकीय अर्थसंकल्प २०२३-२४
पुणे महानगरपालिकेचे आयुक्त विक्रम कुमार यांनी मांडले ९५१५ कोटी रुपयांचे बजेट
- मागील वर्षीपेक्षा यंदाच्या बजेट मध्ये ९२३ कोटींची भर- यंदाच्या अर्थसंकल्पात सर्वाधिक तरतूद पाणीपुरवठा साठी- पाणी पुरवठ्यासाठी १३२१ कोटी रुपयांची तरतूद- शहरातील मलनिसारण साठी ८१२ कोटी रुपये तर घनकचरा व्यवस्थापनसाठी ८४६ कोटी- वाहतूक नियोजन व प्रकल्प साठी ५९० कोटी रुपये- पुण्यातील रस्त्यासाठी ९९२ कोटी रुपयांची तरतूद तर पी एम पी एल साठी ४५९ कोटी रुपयांची तरतूद- पुणे शहरातील प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणासाठी ४६८ कोटी रुपये - आरोग्यासाठी ५०५ कोटी रुपयांची तरतूद- नियमित मिळकत कर भरणाऱ्याना पुणे महानगर पालिका बक्षीस जाहीर करणार यासाठी १ कोटी रुपयांची तरतूद- मिळकर आणि पाणीपट्टी दरांमध्ये कुठलीच वाढ नाही- वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी पुण्यात ८ नवीन उड्डाणपूल उभारणार- नव्याने समाविष्ट 23 गावांसाठी विशेष तरतूद- पगार आणि पेन्शन वर सुमारे ३१०० कोटी खर्च होणार
पुण्यात होणारे काही महत्त्वाचे प्रकल्प
- पुण्यात कचऱ्यापासून हायड्रोजन प्रकल्प उभारणार
- वारजे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल
- सिंहगड रोड उड्डाणपूल, नदी पुनर्जीवन प्रकल्प होणार
- डॉग पार्क, हायड्रो ऊर्जा प्रकल्प, चार्जिंग स्टेशन उभारणे आदींचा समावेश
- शहरात फेरीवाले यांच्यासाठी देखील hawkers प्लाझा/ hawkers पार्क उभी करणार