पुणे : तात्या साहेब..,तुमच्यासारखा शहर लोकप्रतिनिधी मिळायला भाग्य लागतं आणि ते मिळालंय पुणे शहराला. तुम्ही पक्ष सोडू नका ही नम्र विनंती, तुमच्याकडे बघितल्यावर आम्हाला सन्माननीय राज साहेब ठाकरे यांची आठवण येते. तुम्ही पुणे शहाराचे धर्मवीर आहात, अशा प्रकारे वसंत मोरेना विनंती करून त्यांच्या चाहत्यांनी फेसबुकवर प्रतिक्रिया दिल्या आहेत. अजित पवारांच्या ऑफरनंतर वसंत मोरे लवकरच मनसे पक्ष सोडणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. परंतु खुद्द वसंत मोरे यांनी पक्ष सोडण्याबाबत कुठलीही भूमिका जाहीर केली नाही. त्यानंतर नागरिकांनी वसंत मोरे यांच्या फेसबुक पोस्टवर पक्ष न सोडण्याची विनंती केली आहे.
मनसेचे नेते वसंत मोरे यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राष्ट्रवादी पक्षात येण्याची ऑफर दिल्याची माहिती समोर आली होती. पुण्यातील एका लग्नात अजित पवारांनी वसंत मोरेंना ही ऑफर दिली. अजित पवारांच्या या ऑफरनंतर वसंत मोरे लवकरच मनसे पक्ष सोडणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. तसेच वसंत मोरेंनी माध्यमांशी बोलताना जाहीर नाराजी बोलावून दाखवली होती. पुणे शहरातील पक्षामधून मला डावलंल जातंय. मला लक्ष्य केलं जातंय. मला पक्षाच्या कुठल्या कार्यक्रमाला बोलावलं जात नाही. तरीसुद्धा मी कार्यक्रमाला जातो. मला स्टेजवर बसवलं जातं, मात्र भाषणासाठी वेळ दिला जात नाही. या सगळ्या गोष्टी मी मनसेप्रमुख राज ठाकरे यांना सांगितल्या आहेत, असं वसंत मोरेंनी सांगितलं होत.
परंतु वसंत मोरेंच्या उपस्थितीत मंगळवारी काही महिलांनी मनसेत प्रवेश केला. खडकवासला विधानसभा मतदार संघात अनेक महिला भगिनींनी माझ्या उपस्थितीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केल्याचं स्वत: वसंत मोरे यांनी फेसबुकद्वारे सांगितलं. त्यामुळे वसंत मोरे यांनी पक्ष सोडण्याबाबत काही विचार न केल्याचे दिसू लागले आहे. त्यातच चाहत्यांनी त्याना पक्ष न सोडण्याची विनंती केली आहे.
तात्या एकच विनंती आहे की, तुम्ही मनसे सोडू नका. तुमच्याकडे बघितल्यावर आम्हाला सन्माननीय राज साहेब ठाकरे ची आठवण येते. तुम्ही पुणे शहाराचे धर्मवीर आहात. एक महाराष्ट्र सैनिक असल्याचे मत काहींनी व्यक्त केले आहे. तर ''तात्या मनसे पक्ष व राज साहेब ठाकरे यांना सोडून जाऊ नये ही कळकळीची विनंती आहे. कारण तुमचा दरारा एवढा जबरदस्त आहे व तो मनसे पक्षात च शोभून दिसत असल्याचेब काहींचे म्हणणे आहे.
तात्या तुमची वेळ सध्या थोडी खराब आहे. शांत संयमी रहा थोडा काळ पण राजसाहेबांना सोडुन जाऊ नका. तुमच्याशिवाय पुण्याची मनसे नेहमी अपूर्णच राहणार. इथे बाकी कुठल्याही वांग्याला कुणीही विचारत नाही. पुण्यात तुमचाच आवाज राहणार आहे. वेळ तुमचीही येईल साहेबांना सोडू नकामी असेही काहींनी सांगितले आहे. ''तात्या फक्त एक विनंती आहे काही भंगार माणसांमुळे तुम्ही मनसे ला सोडू नका.राज ठाकरेंकडे बघितल्यानंतर आपल्या पुण्यामध्ये तुमची आठवण येते आणि तुमच्याकडे बघितल्या नंतर मनसे ची आठवण येते. ही वेळ निघून जाईल. अशा प्रकारची भावनिक पोस्टही काहींनी केली आहे.