शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
2
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
3
विशेष लेख: गणिते बिघडली, झोप उडाली.. युती की आघाडी?
4
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
5
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
6
Maharashtra Election 2024 Live Updates: 'लाडकी बहीण'सारख्या योजनांचे सरकारने नीट नियोजन केलं आहे- मुख्यमंत्री शिंदे
7
हमीभावाबाबत पंतप्रधान मोदींची महत्त्वाची घोषणा; राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा
8
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
9
Ola Electric CCPA Notice : Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
10
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
11
"एक माणूस म्हणून तो...", इब्राहिमसोबतच्या नात्यावर पलक तिवारीने केलं होतं भाष्य
12
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
13
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
14
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
15
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
16
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
17
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
18
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
20
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...

पुणे विभागात एकही चारा छावणी नाही; बाधित पशुधन ९५ हजार ६७९

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2019 7:20 PM

पावसाने पाठ फिरवल्याने पुणे विभागातील सातारा, सांगली,सोलापूर व पुणे जिल्ह्यात पाणी व चा-याचा कमी अधिक प्रमाणात तुटवडा आहे.

पुणे : पुणे विभागात सांगली व सातारा दोन जिल्ह्यातच दुष्काळाने बाधित झालेल्या पशुधनाची संख्या गुरूवारी (दि.२८) ९५ हजार ६७९ वर गेली आहे. मात्र,अद्याप एकाही ठिकाणी जिल्हा प्रशासनाकडून अनुदानित चारा छावणी सुरू करण्यात आलेली नाही. अखेर काही स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घेवून लहान मोठ्या जनावरांसाठी दोन छावण्या सुरू केल्या आहेत. पावसाने पाठ फिरवल्याने पुणे विभागातील सातारा, सांगली,सोलापूर व पुणे जिल्ह्यात पाणी व चा-याचा कमी अधिक प्रमाणात तुटवडा आहे. त्यातच उन्हाचा तडाखा बसण्यास सुरूवात झाल्याने दुष्काळाची तीव्रता चांगलीच जाणवू लागली आहे. पुणे विभागीय आयुक्त कार्यालयाकडून प्राप्त झालेल्या आकडेवारीनुसार सातारा जिल्ह्यात ५१ हजार ८४३ आणि सांगली जिल्ह्यात ४३ हजार ८३६ जनावरे दुष्काळाने बाधित झाली आहेत. या दोन जिल्ह्यातील दुष्काळ बाधित जनावरांची संख्या ९५ हजार ६७९ असून त्यात दिवसेंदिवस वाढ होत आहे. पुढील आठवड्यात बाधित जनावरांचा आकडा १ लाखावर गेलेला दिसून येईल, असे अधिका-यांकडून सांगितले जात आहे. विभागीय आयुक्त कार्यालयातील पुरवठा विभागाकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार,  साता-यात व सांगली जिल्ह्यात एकही अनुदानित चारा छावणी सुरू झालेली नाही. मात्र, माणदेशी फाऊंडेशनच्या माध्यमातून माण तालुक्यात म्हसवड येथे एक चारा छावणी सुरू आहे.त्यात ८ हजार १०९ तर लहान १ हजार ७९८ अशी एकूण ९ हजार ९०७ जनावरे आहेत. तर सांगली जिल्ह्यात जत तालुक्यात संत सयाची बागडे महाराज चॅरिटेबल ट्रस्टतर्फे सुरू केलेल्या चारा छावणीत मोठे ४४ व लहान २० अशी एकूण ६४ जनावरे आहेत. दुष्काळाने बाधित झालेल्या जनावरांची संख्यांचा विचार करता एकही अनुदानित चारा छावणी सुरू झालेली नाही.चारा छावणी सुरू करण्याचे अधिकार जिल्हाधिका-यांना देण्यात आलेले आहेत.मात्र,जिल्हा प्रशासनाकडून छावणी सुरू करण्याबाबत सकारात्मकता दाखवली जात नसल्याचे दिसून येत आहे. ----------दुष्काळ बाधित जनावरांची जिल्हा व तालुका निहाय संख्या : सातारा जिल्हा : माण- २९,०६३ खटाव १४,४४७, खंडाळा- १२८, फलटण- १,५७३, वाई- ६,३९७, पाटण-२३५, सांगली: खानापूर ५,८४७, आटपाडी -३७,९८६ -----------------------

टॅग्स :PuneपुणेGovernmentसरकारFarmerशेतकरी