शहरं
Join us  
Trending Stories
1
'तुम्ही मला गप्प करू शकणार नाही...', काँग्रेसच्याच कार्यक्रमात राहुल गांधींचा माईक बंद झाला
2
विधानसभेत EVM ने केला घात?; शरद पवारांच्या पक्षाच्या बैठकीत सूर; मोठं आंदोलन उभारणार!
3
या दिवशी होणार राज्याच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा, शिंदे गटाच्या बड्या नेत्याचा दावा 
4
धीरेंद्र शास्त्रींवर अज्ञाताने मोबाईल फेकला; गालाला लागला, म्हणाले...
5
एकनाथ शिंदेंना दिल्लीत आणा, ऐकलेच नाहीत तर भाजपाने अजित पवारांसोबत सत्ता स्थापन करावी; केंद्रीय मंत्र्याचे वक्तव्य
6
Video - ९० हजारांचं बिल पाहून ग्राहकाचं डोकं फिरलं, रागाच्या भरात हातोड्याने फोडली स्कूटर
7
राज्याभिषेकावरून वाद, उदयपूर पॅलेसमध्ये राडा, महाराणा प्रताप यांचे वंशज आमने सामने
8
EVM अन् डायरीतील मतांमध्ये फरक कसा आला?; सोलापुरातील प्रकाराबाबत नवी माहिती उघड
9
Video - खांद्यावर शाल, हातात बॉम्ब आणि नाईट क्लब टार्गेट; चंदीगड हल्ल्याचं CCTV फुटेज
10
"एकनाथ शिंदेंना उपमुख्यमंत्री व्हायचं नसेल, तर..."; रामदास आठवलेंनी सांगितला तोडगा
11
एकनाथ शिंदेंनी मोदी-शाहांकडे कळवला निर्णय; मुख्यमंत्रिपदावरून काय बोलले?
12
हरयाणा, महाराष्ट्रानंतर आता भाजपाचा दिल्लीवर डोळा, केजरीवालांना नमवण्यासाठी आखली अशी रणनीती
13
video: गावात शिरली 20 फुटी मगर; तरुणाने पकडून खांद्यावर घेतले अन् सुखरुप नदीत सोडले...
14
रेखा झुनझुनवालांनी २ शेअर्समधून १० मिनिटांत कमावले ₹१०५ कोटी, तुमच्याकडे आहेत का 'हे' स्टॉक्स?
15
सोन्याच्या ४० खाणी, इतकं सोनं की विचारूच नका; 'यांच्या' हाती लागला कुबेराचा खजिना
16
नामांकित कॉलेजमधील शिक्षकाकडून विद्यार्थिनीसोबत व्हॉट्सॲपवर अश्लील चॅटिंग; अकोले इथं तणाव
17
प्रसाद ओकने असं काय विचारलं की मंंजिरीने थेट चिमटाच गरम केला? पती-पत्नीचा धमाल व्हिडीओ व्हायरल
18
Fact Check : नागपुरात EVM सह भाजपाचे कार्यकर्ते पकडल्याचा दावा खोटा; नेमकं प्रकरण काय?
19
Baba Siddiqui :"लॉरेन्स बिश्नोई गँगने मूर्ख बनवलं, दाऊदचा फोटो दाखवला अन्..."; आरोपीचा खळबळजनक खुलासा
20
"रेशीमगाठ कधीच झाकोळली गेली नाही...", प्राजक्ताची मालिकेसाठी खास पोस्ट; प्रेक्षकांचे मानले आभार

कपडे आणि बीभत्सपणाचा संबंध नाही

By admin | Published: December 20, 2014 11:21 PM

तुम्ही कसे कपडे घातले आहेत किंवा कपडे घातलेच नाहीत, याचा बीभत्सपणाशी संबंध नाही. पूर्ण कपडे घालूनही बीभत्सपणे मी वागू शकतो. आपण जन्माला येतो,

आमिर खानचे उद्गार : पोस्टरसाठी खास फोटो शूट नाही, तो फोटो चित्रपटातील एक क्षणमुंबई : तुम्ही कसे कपडे घातले आहेत किंवा कपडे घातलेच नाहीत, याचा बीभत्सपणाशी संबंध नाही. पूर्ण कपडे घालूनही बीभत्सपणे मी वागू शकतो. आपण जन्माला येतो, तेव्हा कपड्यांशिवायच येतो. नंतर आपल्याला कपडे घालण्याची सवय लागते, असे सुप्रसिद्ध अभिनेता आमिर खान याने सांगितले. ‘पीके’या आमिर खानच्या आगामी चित्रपटाच्या निमित्ताने ‘लोकमत’तर्फे एका खास कार्यक्रमाचे आयोजन वांद्रे येथील ताज लँड एण्ड्समध्ये करण्यात आले होते. या कार्यक्रमाला आमिर खान, अभिनेत्री अनुष्का शर्मा, दिग्दर्शक राजकुमार हिरानी आणि निर्माता विधू विनोद चोप्रा हे उपस्थित होते. या कार्यक्रमात ‘पीके’च्या पोस्टरविषयी अभिनेता आमिर खान यांनी बोलणे टाळले. पण, त्याच वेळी आमिर म्हणाला, की पोस्टरची संकल्पना म्हणून हे वेगळे फोटो शूट केलेले नाही. पोस्टरवरचा फोटो हा चित्रपटातील एक क्षण आहे; पण तरीही हा चित्रपट सगळ्या कुटुंबाबरोबर तुम्ही पाहू शकता. कारण चित्रपटात हे इतक्या सहजनेते आले आहे, की त्यात मला वेगळे असे काहीच वाटले नाही. पण, कपडे घातले पाहिजेत, असे आपल्या मनावर ठसवले जाते, त्यामुळेच आपण असा विचार करायला लागतो. विधू विनोद चोप्रा यांना २००-३०० कोटींच्या क्लबविषयी तुमचे काय म्हणणे आहे, असे विचारले असता त्यांनी सांगितले, की कोटींचा क्लब अशा कोणत्याही गोष्टीचा मी कधीच विचार करीत नाही. चित्रपट चांगला असला पाहिजे, हे आम्हाला महत्त्वाचे असून, मी त्याचाच विचार करतो. चित्रपट चांगला बनणे गरजेचे आहे़ चित्रपटाने १ कोटी कमावले किंवा १ हजार कोटी कमावले, याचा विचार आम्ही करीत नाही, असे चोप्रा यांनी सांगितले.‘पीके’ चित्रपटात मी एका पत्रकाराच्या भूमिकेत आहे. मी एक चांगली पत्रकार आहे, इतकेच माझ्या भूमिकेविषयी सांगेन. चित्रपट येण्याआधीच माझा लुक आवडल्याचे कळले असल्यामुळे मला याचा आनंद आहे, असे अनुष्का शर्माने सांगितले. तुमच्या चित्रपटांतील व्यक्तिरेखा तुम्हाला भेटतात कुठे, असा प्रश्न विचारल्यावर, ‘खरे सांगायचे तर या व्यक्ती आपल्याला प्रत्येकाला आयुष्यात भेटतात. कथा लिहिताना व्यक्तिरेखांवर अधिक काम केले जाते,’ असे राजकुमार यांनी सांगितले. या सगळ््यांना ‘लोकमत’च्या फीचर एडिटर अर्पणा वेलणकर यांनी बोलते केले. (प्रतिनिधी)राजकुमार हिरानींनी ‘लगे रहो मुन्नाभाई’नंतर ‘पीके’च्या कथेवर काम सुरू केले होते. मात्र, कथेचा पहिला भाग लिहून झाल्यानंतर त्यांनी ‘थ्री इडियट्स’वर काम सुरू केले. ‘थ्री इडियट्स’ दरम्यान हिरानी यांनी आमिरला ‘पीके’च्या कथेविषयी सांगितले. तो चित्रपट पूर्ण झाल्यानंतर आमिरने काही महिन्यांनी हिरानींना ‘पीके’ची कथा ऐकायला बोलावले. कथा ऐकून अवघ्या दोन तासांत त्याने चित्रपटात काम करण्यास होकारही दिला. अभिनेत्री म्हणून अनुष्का शर्मा ही पहिली निवड नव्हती. त्याआधी दीपिका पदुकोण आणि कतरिना कैफ यांची नावे आघाडीवर होती. आमिरलाही दीपिकाने चित्रपटात काम करावे, असे मनापासून वाटत होते; पण दीपिका तेव्हा तीन चित्रपट करीत होती. त्यामुळे साहजिकच तिच्याजवळ वेळ नव्हता. कतरिनाबरोबर हिरानींचे ट्युनिंग जमले नाही. कोणती अभिनेत्री घ्यायची, याचा शोध सुरू असताना आदित्य चोपडाने अनुष्का शर्माचे नाव सुचवले. अनुष्काने याआधी हिरानींबरोबर काम करण्यासाठी प्रयत्न केले होते. आपण ‘थ्री इडियट्स’साठी आॅडिशन दिली होती, असे अनुष्काने सांगितले होते. या आॅडिशनदरम्यान ‘मुन्नाभाई’ चित्रपटातला एक सीन करण्यास दिला होता. त्यात अनुष्काच्या अत्यंत वाईट अभिनयामुळे तिला लगेच ‘तू जाऊ शकतेस’ असे सांगण्यात आले होते.अनुष्काने ‘पीके’ चित्रपटात बाईकही चालवली आहे. त्यादरम्यान ती बाईकवरून पडल्याने जखमी झाली होती. पण जिद्दीने प्रयत्न करून अवघ्या ४ दिवसांत ती बाईक चालवायला शिकली. ज्या बाईकवर अनुष्काचे सीन्स चित्रित झाले, तीच बाईक युनिटने तिला गिफ्ट म्हणून दिली, असे सांगितले जाते.