कोथरूड : कामाचा मोबदला म्हणून धनादेश मिळाला; परंतु बँकेतून एवढी रक्कम काढता येत नाही, असे सांगून धनादेश नाकारल्याची घटना कोथरूडमध्ये घडली आहे. नथुराम येडगे यांनी सांगितले, की त्यांनी केलेल्या कामाचा मोबदला म्हणून त्यांना ८१०० रुपयांचा धनादेश मिळाला होता. तो घेऊन बँकेत गेले असता बँकेने पाच हजारांपेक्षा जास्त रुपये देता येत नाही असे कारण सांगून धनादेश स्वीकारण्यास नकार दिला. येडगे म्हणाले की, माझ्या कष्टाचे पैसे असून मला मिळत नाही, ही खूप क्लेशदायक बाब आहे. ८००० ही रक्कम काही फार जास्त नाही. उद्योगपती, राजकारण्यांना वाट्टेल तेवढी रक्कम दिली जाते; परंतु सर्वसामान्यांना नाडले जाते. आता आम्ही दाद तरी कोणाकडे मागावी. यासंदर्भात संबंधित बँकेच्या व्यवस्थापकाशी संपर्क होऊ शकला नाही.(वार्ताहर)
धनादेश मिळूनही पैसे नाही
By admin | Published: December 24, 2016 12:53 AM