"प्रस्ताव पाठवण्याची गरज नाही पुण्याचा पालकमंत्री म्हणून मीच निर्णय घेणार"
By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2021 06:55 PM2021-08-08T18:55:44+5:302021-08-08T18:55:56+5:30
राज्यात कुठेही निर्बंध शिथिल कारण्याबाबतचा निर्णय घेण्यात आम्हाला अजिबात हौस नाही.
पुणे : राज्यात कुठेही निर्बंध शिथिल कारण्याबाबतचा निर्णय घेण्यात मला अजिबात हौस नाही. पुण्याबाबत विचारणा होत असताना प्रस्ताव पाठवण्याची काही गरज नाही. मी पालकमंत्री म्ह्णून निर्णय घेण्यास समर्थ आहे. असा खोचक टोला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लगावला आहे.
ज्या ठिकाणी गर्दी जमते तिथे कोरोनाबाधित रुग्ण वाढले आहे. त्यामुळे निर्णय घ्यावे लागतात. पण आता कुणी पुण्याचं काही विचारलं तर सांगा पालकमंत्री निर्णय घेतला. असं पवार म्हणाले.
राज्यात निर्बंध शिथिल न झालेल्या जिल्ह्यात पुण्याचाही समावेश होता. पण पुण्याचा पॉझिटिव्हिटी रेट कमी असताना सूट का मिळत नाही? असा सवाल पुण्यातील व्यापारी आणि लोकप्रतिनिधीनी उपस्थित केला होता. त्यावर महाविकास आघाडीच्या काही मंत्र्यांनी शिथिलता आणण्याबाबत प्रस्ताव पाठ्वल्याचे सांगितले होते. अजितदादांनी अप्रत्यक्षपणे त्यांना सल्ला दिला आहे.
पुण्यात निर्बंध अखेर शिथिल करण्यात आले आहे. पण, मुंबईसाठी वेगळे नियम आणि पुण्यासाठी वेगळे नियम ठेवण्यावरून वाद निर्माण झाला होता. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे पुण्यात वाद निर्माण झाला होता. अखेर पुण्यातला वाद सोडवण्यासाठी बैठक घेऊन थेट निर्णय घेतला. पुण्यात दुकानं आता रात्री ८ वाजेपर्यत खुली राहणार आहे. तर हॉटेल १० पर्यंत सुरू राहणार आहे. हा निर्णय घेत असताना अजित पवारांनी आपली रोखठोक भूमिका सुद्धा मांडली.
व्यापाऱ्यांचे आंदोलन चुकीचे
व्यापाऱ्यांनी हे असं करायला नको होतं. त्यांना माहिती आहे, हे हौसेने आम्ही करत नाही. सरकारचा महसूल बुडतो. पण लोकांचे जीव महत्वाचे आहेत, ज्या ठिकाणी गर्दी जमते तिथे कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढते. पुण्यात कोरोनाची लाट आली होती तेव्हा दोनच लॅब आपल्याकडे होत्या. ऑक्सिजन सुद्धा बाहेरून मागावे लागले होते, असंही पवार म्हणाले.