शहरं
Join us  
Trending Stories
1
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
2
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
3
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
4
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
5
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
6
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
7
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
8
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
9
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
10
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
11
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
12
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
13
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
14
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
15
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
16
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
17
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
18
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
19
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
20
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू

कोरेगावात घुंगरांच्या छमछमला विरोधच

By admin | Published: January 30, 2016 3:55 AM

पुणे-नगर महामार्गावर सणसवाडीनंतर कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथे सांस्कृतिक कला केंद्र सुरू करण्याबाबत परवान्याचा विषय ऐरणीवर आलेला आहे. त्यामुळे आता कोरेगावातही घुंगरांचा नाद

कोरेगाव भीमा : पुणे-नगर महामार्गावर सणसवाडीनंतर कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथे सांस्कृतिक कला केंद्र सुरू करण्याबाबत परवान्याचा विषय ऐरणीवर आलेला आहे. त्यामुळे आता कोरेगावातही घुंगरांचा नाद घुमणार का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. मात्र महिला मंडळाच्या व ग्रामस्थांच्या ठोस विरोधामुळे सरपंच असेपर्यंत कला केंद्रास परवानगी देणार नाही, अशी ठोस भूमिका सरपंच अनिता भालेराव यांनीही घेतली आहे. ग्रामसभेतही कला केंद्राचा विषय चर्चिला जाणार नसल्याने कला केंद्राच्या विषयाला पूर्णविराम मिळाला आहे. अर्जदारानेही परवान्याचा अर्जच माघारी घेतला आहे. कोरेगाव भीमा ग्रामपंचायतीकडे १३ जानेवारीस सांस्कृतिक कला केंद्रास परवानगीचा अर्ज दाखल झाला. या अर्जावर ग्रामपंचायतीच्या मासिक सभेने व महिला सभेने ग्रामसभेत निर्णय घेण्याचे जाहीर केल्याने ग्रामस्थांमध्ये उलटसुलट चर्चा चालू असतानाच २६ जानेवारीस होणारी ग्रामसभा गणसंख्येअभावी तहकूब करण्यात आली होती. दरम्यान, गावातील प्रियदर्शनी महिला मंडळाने व ग्रामस्थांनी कला केंद्र होऊ न देण्याची भूमिका घेतली होती. दरम्यान, गावात कला केंद्र सुरू होणार की नाही, अशी उलटसुलट चर्चा सुरू असतानाच तंटामुक्ती समितीच्या बैठकीत प्रियदर्शनी महिला मंडळाने कला केंद्राच्या परवान्याविरोधात अर्ज दाखल केला. कला केंद्रास ग्रामस्थांचा वाढता विरोध लक्षात घेत व अर्जदाराने कला केंद्राच्या परवान्याचा अर्ज माघारी घेतला असल्याने ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच अनिता भालेराव यांच्या उपस्थितीत घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत सांगण्यात आले. या वेळी काँग्रेस सेवा दलाचे तालुकाध्यक्ष नारायणराव फडतरे, राजाराम ढेरंगे, अशोक काका गव्हाणे, महेश ढेरंगे, राष्ट्रवादीचे तालुका उपाध्यक्ष बबुशा ढेरंगे, ग्रामपंचायत सदस्य रमेश शिंदे, पै. गणेश फडतरे, जितेंद्र गव्हाणे, सुरेंद्र भांडवलकर, संगीता गव्हाणे, संगीता कांबळे, आशा काशीद, कल्पना गव्हाणे, मालन साळुंखे, शारदा गव्हाणे, दिनकर गव्हाणे, आशिष सव्वाशे, सुनील ढेरंगे, सुमन ढेंरगे, कृष्णाबाई गव्हाणे, भामाबाई गव्हाणे, मंजुळाबाई सासवडे, मालन गव्हाणे उपस्थित होत्या. नारायणराव फडतरे व राजाराम ढेरंगे यांनी सांगितले, ‘‘गावच्या विकासाच्या दृष्टीने घातक असणाऱ्या कला केंद्रास ग्रामस्थांचा विरोध लक्षात घेऊन सकारात्मकपणे घेतलेला निर्णय योग्य असून यापुढील काळातही गावच्या हिताचेच निर्णय सत्ताधाऱ्यांकडून घेतले जातील, तर गावात शाळा, कॉलेज असल्याने गावच्या प्रगतीच्या दृष्टीने मारक असणाऱ्या कला केंद्राविरोधात ग्रामस्थांनी ठोस भूमिका घेतल्याने या निर्णयाचे स्वागत असून गावच्या विकासाच्यादृष्टीने सकारात्मक निर्णयांना पाठिंबा आहे, अशी भूमिका विरोधी गटाकडून मांडण्यात आली.’’ अजून किती संसार उद्ध्वस्त करायचे?परिसरात असणाऱ्या कला केंद्रामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाल्याची उदाहरणे समाजात पाहण्यास मिळत आहेत. गावात २३ वर्षे दारूविरोधात आम्ही महिला मंडळाच्या माध्यमातून लढा देत आहोत. गावात कला केंद्राच्या परवानगीचा विषय आल्याने अजून किती महिलांचे संसार उद्ध्वस्त करायचे आहेत, असा सवाल प्रियदर्शनी महिला मंडळाच्या प्रमुखांनी उपस्थित केला आहे,