सासवड : ‘पुरंदर तालुक्यावर दुष्काळी म्हणून शिक्का आहे. 1962 ते 72 मध्ये तत्कालीन आमदार स्व. बापूसाहेब खैरे यांनी गराडे, घोरवडी, पिलाणवाडी, नाझरे या धरणांची निर्मिती केली. आज ही धरणो वजा केली, तर तालुक्यात काय राहील?’ असा सवाल करून गेल्या 42 वर्षात लोकप्रतिनिधींनी पाण्यासाठी एकही प्रकल्प राबविला नाही किंवा त्यासाठी प्रय}ही केले नाहीत, असे प्रतिपादन संजय जगताप यांनी केले.
पिंपळे (ता. पुरंदर) येथे युवक काँग्रेसच्या शाखेचे उद्घाटन संजय जगताप यांच्या हस्ते झाले, त्या वेळी ते बोलत होते. जगताप म्हणाले, ‘‘सासवडमध्ये 1क् वर्षापूर्वी पाण्याची टंचाई होती. दररोज 5क् टँकरने पाणीपुरवठा केला जात होता. चंदुकाका जगताप यांच्या हाती नगरपालिकेची सत्ता आल्यावर वीर धरणातून पाणी योजना करून सासवडचा पाणीप्रश्न कायमचा मिटविला. आज सासवड पाण्याबाबत स्वयंपूर्ण आहे.’’
निवडून आल्यावर लोकप्रतिनिधी स्वत:च्या गावात किती दिवस राहिले, असा सवाल करून सासवड स्वयंपूर्ण व सुरक्षित झाल्यामुळे विद्यमान लोकप्रतिनिधी निवडणुकीनंतर आपल्या गावी न राहता सासवडला राहायला आले, असे जगताप यांनी सांगितले.
आमदारांनी स्वत: एकही संस्था स्थापन केली नाही; उलट आमच्या संस्थेतील कर्मचा:यांना पगार देत नाही, अशी खोटी माहिती ते देत आहेत, असे जगताप म्हणाले.
या वेळी जिल्हा परिषद सदस्या मनीषा काकडे, प्रदीप पोमण, गणोश मेमाणो, प्रा. शशिकांत काकडे, पिंपळे, युवक काँग्रेसचे अक्षय क्षीरसागर, सचिन भणगे, संदीप लोळे आदींनी मनोगत व्यक्त केले. या प्रसंगी शिवसेनेतून प्रशांत वाल्हेकर, तानाजी ए. चव्हाण, राष्ट्रवादीतून तानाजी चव्हाण यांसह अनेक कार्यकत्र्यानी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
या वेळी पंचायत समिंती सदस्य दत्ता झुरंगे, विठ्ठल मोकाशी, अप्पा दिघे, उत्तमभाऊ पोमण, श्रीरंग खेनट, किसन खेनट, सोपान भणगे, संजय पोमण, लालबहाद्दूर खेनट, भीमराव कांबळे, दत्तात्नय खेनट, संपत खेनट, सतीश पोमण, नंदू पोमण, दशरथ पोमण यांसह महिला व ग्रामस्थ उपस्थित होते. (वार्ताहर)