पुणे- शेतकरी संघटनेच्या वतीने गेल्या तीन दिवसांच्या राष्ट्रीय किसान परिषदेचा समारोप कार्यक्रम शनिवार वाडा येथे करण्यात आला होता. यावेळी एस. एम. जोशी सभागृह ते शनिवारवाडा मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीच्या सांगतेला शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथ पाटील म्हणाले, तीन दिवसांच्या परिषदेत एकही राजकीय पक्ष आमच्या सोबत आलेला नाही.यावरून शेतकऱ्यांच्या बाजूने एकही राजकीय पक्ष नसल्याचे निष्पन्न झालेलं आहे. त्यामुळे आगामी काळात शेतकरी स्वतः राजकारणात प्रवेश करणार आहे. तसेच काँग्रेस व राष्ट्रवादी यांच्या हल्लाबोल आंदोलनावर सडकून टीका करताना म्हणाले, सौ चूहे खाकर बिल्ली चली हज को अशी अवस्था आहे. त्यांच्या नागपूर येथील अधिवेशनातल्या हल्लाबोल आणि गदारोळावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.पुढे ते म्हणाले, पंधरा वर्षं सत्ता उपभोगताना शेतकऱ्यांचे प्रश्न कळाले नाही. त्यांच्या चुकीच्या निर्णयाच्या पापाचे फळ आजचा शेतकरी भोगत आहे. भाजपाने अधिवेशन चालू न देण्याच्या निर्णयाचे उट्टे काढण्याचे काम आता काँग्रेस करत आहे. कर्जमाफी शेतकऱ्यांच्या घरापर्यंत पोहोचलेले नाही.
तीन दिवसांच्या परिषदेत एकही राजकीय पक्ष आमच्या सोबत नाही- रघुनाथ पाटील
By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2017 8:01 PM