शहरं
Join us  
Trending Stories
1
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
2
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
3
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
4
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
5
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
6
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
7
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
8
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
9
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
10
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
11
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
12
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
13
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
14
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
15
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
16
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
17
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
18
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
19
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
20
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला

जिल्ह्यातील ९३ शाळांची नोंदच नाही

By admin | Published: October 17, 2015 1:03 AM

बनावट पट व शाळांचा भंडाफोड ‘सरल’च्या नोंदीमुळे झाला आहे. नोंदीसाठी १५ आॅक्टोबर हा शेवटचा दिवस असला तरी आज दिवसभर सर्व्हर डाऊन होता. १३ आॅक्टोबरपर्यंत जिल्ह्यातील ९३ शाळांची नोंदच झाली नव्हती.

पुणे : बनावट पट व शाळांचा भंडाफोड ‘सरल’च्या नोंदीमुळे झाला आहे. नोंदीसाठी १५ आॅक्टोबर हा शेवटचा दिवस असला तरी आज दिवसभर सर्व्हर डाऊन होता. १३ आॅक्टोबरपर्यंत जिल्ह्यातील ९३ शाळांची नोंदच झाली नव्हती. तसेच ३५ हजार ६0८ विद्यार्थी बोगस असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आज या सॉफ्टवेअरमध्ये नोंदी करण्याचा शेवटचा दिवस होता. मात्र, सकाळपासूनच ही वेबसाईट चालूच होत नसल्याने रात्री उशिरापर्यंत याची आकडेवारी मिळू शकली नाही. राज्यातील सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळांना शालेय दस्तऐवज संगणीकृत करण्याच्या सूचना सरकारने दिल्या होत्या. यात जिल्ह्यातील एकूण शाळा, चालू शाळा, विद्यार्थी संख्या याचबरोबर सुविधांची माहिती यात भरावयाची होती. ही माहिती भरण्यासाठी १५ आॅक्टोबर ही शेवटची तारीख होती. मात्र आज ही साईटच ओपन झाली नसल्याने बहुतांश शाळांना नोंदीच करता आल्या नाहीत. वर्षभरापूर्वी जिल्ह्यातील शाळांची पटसंख्येची माहिती शासनाने मागविली होती. त्यात जिल्ह्यातील १३ तालुक्यांत ५ हजार २९३ शाळांमध्ये ९ लाख ४६ हजार ५८३ विद्यार्थीसंख्या असल्याचे शिक्षण विभागाने कळविले होते. त्या माहितीच्या अधारे ‘सरल’च्या माध्यमातून आॅनलाईन नोंदी करण्याचे आवाहन शाळांना शासनाने केले होते. १३ आॅक्टोबरपर्यंत या माध्यमातून झालेल्या नोंदींनुसार जिल्ह्यात ५ हजार २00 शाळा सुरू असल्याचे समोर आले आहे. म्हणजे ९३ शाळांच्या अद्याप नोंदीच झाल्या नाहीत.जर शेवटच्या दोन दिवसांत काही शाळांनी नोंदी केल्या असल्या तरी सुमारे ६0 ते ६५ शाळा या विविध कारणांनी बंद असल्याचे सुत्रांनी सांगितले. यात कमी पटसंख्या हे महत्वाचे कारण आहे. (प्रतिनिधी)>>३५,६०८ विद्यार्थी गायबजिल्ह्यातील ९ लाख ४६ हजार ५८३ विद्यार्थ्यांपैकी ९ लाख १० हजार ९७५ विद्यार्थ्यांच्या नोंदी झाल्या आहेत. सुमारे ३५ हजार ६०८ विद्यार्थी गायब आहेत. यातही सर्वाधिक हवेली तालुक्यात २७ हजार २५१, जुन्नरमध्ये ३ हजार ५१६, मुळशीत १ हजार १८४, दौंडमध्ये १ हजार १२४ तर भोरमध्ये १ हजार ११५ विद्यार्थ्यांची नोंदच नाही. इतर तालुक्यांत मावळमध्ये ९६७, आंबेगावमध्ये ९४३, खेडमध्ये ५४६, शिरूरमध्ये ४४०, विद्यार्थ्यांच्या नोंदी नाहीत., तर इंदापूर तालुक्यात शाळांची संख्या कमी होऊनही विद्यार्थिसंख्या १ हजार २४ नी वाढली आहे. त्यापाठोपाठ बारामतीती ३१५, पुरंदरमध्ये १२५ तर वेल्हेमध्ये १३ विद्यार्थी जास्त झाले आहेत.>>शेवटच्या दिवसापर्यंत ज्या शाळांच्या नोंदी झाल्या नाहीत, त्या कशामुळे बंद आहेत किंवा त्यांनी का नोंदी केल्या नाहीत, याची माहिती घेण्याच्या सूचना तालुका शिक्षण अधिकाऱ्यांना दिल्या जातील. त्यानंतरच वास्तव परिस्थिती समोर येईल.- संजय नाईकडे, उपशिक्षणाधिकार, प्राथमिक