पुणे : आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत दूध पावडरचे दर कमी झाल्यामुळे खासगी दूध व्यावसायिकांनी दूध खरेदी दर एक रुपयाने कमी केला आहे. जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाने मात्र दुध खरेदी दरात कपात न करण्याचा निर्णय घेतला आहे. संघाचे कार्यकारी संचालक यांनी दिलेल्या माहितीनुसार, वाढत्या महागाईमुळे दुध उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. त्यातच खासगी व्यावसायिकांनी दूध खरेदी दरात कपात केल्यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणीत आणखी भर पडली आहे. ही बाब लक्षात घेवून जिल्हा संघाने पूर्वीचाच खरेदी दर कायम ठेवला आहे. संघ गायीच्या दुधासाठी २४ रुपये प्रतिलिटर खरेदी दर देत आहे. दुध उत्पादक शेतकऱ्यांनी सहकारातील कात्रज डेअरीस जास्तीत जास्त दुध पुरवठा करावा, असे आवाहन दूध संघाचे अध्यक्ष बाळासाहेब खिलारी यांनी केले आहे. (प्रतिनिधी)
दूध खरेदी दरात कपात नाही
By admin | Published: October 21, 2014 5:18 AM