शहरं
Join us  
Trending Stories
1
"...यामुळेच हा ऐतिहासिक विजय झाला"; हरयाणाच्या निकालावर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया
2
दिल्लीच्या जवळपास कमळाची कमाल, आम आदमी पार्टी बेहाल; डिपॉझिटही वाचलं नाही!
3
J&K मध्ये फुटीरतावादाचा सुपडा साफ, एआयपी आणि जमात-ए-इस्लामीला मतदारांनी नाकारले
4
हरयाणा निवडणुकीचे 'मॅन ऑफ मॅच' ठरलेल्या CM नायबसिंग सैनी यांची संपत्ती किती?
5
जुन्नरमध्ये आयात उमेदवाराच्या हाती तुतारी दिल्यास बंड अटळ?; मविआतील नाराज निष्ठावंतांच्या गोटात हालचालींना वेग
6
परदेशात जाऊन आपल्या देशाचा अपमान करणाऱ्यांना जनतेने धडा शिकवला- अमित शाह
7
गेल्या महिन्यात कोणत्या कंपनीनं सर्वाधिक विकल्या Electric Scooters?
8
'तेरे करके' पेक्षा No Look Shot ची चर्चा; नताशाच्या पोस्टवर 'हार्दिक' कमेंटचं ट्विस्ट
9
"महाराष्ट्रातील जनताही अशा फेक..."; हरयाणातील निकालानंतर CM शिंदेंचा MVA वर 'वार'
10
"आपण तर खरोखरच मोठी 'पनौती' निघालात, हुड्डांनाही..."; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा राहुल गांधींवर निशाणा
11
बुलेट ट्रेन जितकी खास, तितकीच स्टेशनही... वीज बचत अन् प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य!
12
"हा विजय केवळ मोदीजींमुळेच शक्य झाला"; हरयाणाच्या निकालानंतर मुख्यमंत्री सैनी यांचे विधान
13
Haryana, Jammu & Kashmir Assembly Election Results 2024 Live: काँग्रेसचे 'खटाखट-खटाखट' मॉडेल फेल: अनुराग ठाकूर
14
नायब सिंह सैनींनी मारली बाजी; विजयादशमीला घेऊ शकतात मुख्यमंत्रीपदाची शपथ?
15
'आजच बारामतीचा उमेदवार जाहीर करा'; अजित पवार म्हणाले, "तुमच्या मनातील..."
16
"कुठे आम्ही ६० जागा जिंकण्याच्या बाता मारत होतो आणि…’’, निकालांबाबत कुमारी शैलजा म्हणाल्या
17
जम्मू-काश्मीरच्या 'या' सात जागांवर काँग्रेस आणि एनसीत मैत्रीपूर्ण लढत; जाणून घ्या निकाल...
18
"मल्लिकार्जुन खर्गेजी पत्ता सांगा, 'ती' जिलेबी...", भाजप खासदार तथा केंद्रीय मंत्र्याचा राहुल गांधींना बोचरा टोला
19
नवी मुंबईत महायुतीला झटका, शिंदेसेनेत बंडखोरी होणार, विजय नाहटा तुतारी हातात घेणार
20
काँग्रेसचा हरयाणात पराभव; कुमारी शैलजा म्हणाल्या,'वेळेवर मौन बाळगणे..."

राजगुरूनगर नगरपरिषद अर्थसंकल्पात कोणतीही करवाढ नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 05, 2021 4:11 AM

राजगुरुनगर : राजगुरुनगर नगरपरिषदेचा सन २०२०-२१ या आर्थिक वर्षासाठीचा नगरपरिषद इतिहासातील पाचवा अर्थसंकल्पात कोणतीही करवाढ करण्यात आली नाही. ...

राजगुरुनगर : राजगुरुनगर नगरपरिषदेचा सन २०२०-२१ या आर्थिक वर्षासाठीचा नगरपरिषद इतिहासातील पाचवा अर्थसंकल्पात कोणतीही करवाढ करण्यात आली नाही. खर्चात कपात केली आहे. कोणतीही करवाढ केली नाही मात्र व्यवसाय परवाना शुल्कात वाढ करण्यात आली आहे. राजगुरूनगर नगर परिषदेचे मुख्याधिकारी प्रकाश पाटील यांनी दिली.

राजगुरुनगरला नव्याने नगरपरिषद स्थापन झाल्यानंतरचा हा पाचवा अर्थसंकल्प आहे. या अर्थसंकल्पात कोणतीही करवाढ करण्यात आली नाही. राजगुरूनगर परिषदेचा ९ हजार २१९ रुपये असा शिलकीचा अर्थसंकल्प आहे. केवळ व्यवसाय परवाना शुल्कामध्ये वाढ करण्यात आली आहे. विकासाच्या दृष्टीने व जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष न करता मार्गदर्शक तत्त्वानुसार प्रशासनाने हे अंदाजपत्रक बनविले आहे. नगरपरिषदेचे आर्थिक बाजू सक्षम राहण्यासाठी नवीन आर्थिक वर्षात करवसुलीला प्राधान्य देण्यात आले आहे. पाणी योजना, शहरातील भुयारी गटार योजना व शहरातील अनेक भागामध्ये रस्ते मजबुतीकरणाला प्राधान्य देण्यात आले आहे. शहरातील नागरिकांना स्वच्छ व मुबलक पाणी देण्यासाठी अर्थसंकल्पात विशेष तरतुदी करण्यात आल्या आहेत.

मागील वर्षी (सन २०१९-२०) ३० लाख ७२ हजार रुपये शिलकीचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला होता. यावेळी मात्र मर्यादित उत्पन्न व खर्च साधण्याचा प्रयत्न या अर्थसंकल्पात करण्यात आला आहे. नको असलेल्या खर्चाला काटछाट देण्यात आली आहे. करोना विषाणू संक्रमण संकट असल्याने उत्पन्न व खर्चावर मर्यादा ठेवण्यात आल्या आहेत. आरंभीची शिल्लक १७ कोटी ५२ लाख ०९ हजार ०२७ रुपये, एकूण जमा रक्कम ५१ कोटी २९ लाख ४८ लाख ०९३ रुपये आणि एकूण खर्च ६८ कोटी ८१ लाख ४७ हजार ९०१ रुपये असून ९ हजार २१९ असा शिलकीचा अर्थसंकल्प आहे. राजगुरूनगर नगर परिषदेच्या यावर्षीचा अर्थसंकल्पातील महत्वाच्या काही तरतुदी पुढीलप्रमाणे -

* भुयारी गटार योजना - २८ कोटी ०४ लाख ३९ हजार ५५८ रुपये.

* कचरा उचलणे व प्रक्रिया - १ कोटी ९० लाख रुपये.

* नळ कनेक्शन मीटर - ३ कोटी ९५ लाख ०६ हजार ५९३ रुपये.

* रस्ते बांधकाम - ५ कोटी ८७ लाख १५ हजार ५११ रुपये.

* पाणी पुरवठा(एक्स्प्रेस फिडर बसवणे) - १ कोटी ८५ लाख रुपये.

* शहरांतर्गत हायमास्ट बसविणे - ३८ लाख ५१ हजार ३१४ रुपये.

* न. पा. इमारत फर्निचर - २० लाख रुपये.

* दिवे आणि विद्युत खांब - ३० लाख रुपये.

* पाणी पट्टी व वीज - ६५ लाख रुपये राजगुरूनगर नगरपरिषदेच्या अर्थसंकल्पातील उत्पन्नाच्या प्रमुख बाबी पुढीलप्रमाणे -

* करापासूनचे उत्पन्न - २ कोटी ८५ लाख १५ हजार रुपये.

* फी पासून उत्पन्न - १० लाख ५६ हजार रुपये.

* बांधकाम परवानग्या - १ कोटी ५५ लाख ५० हजार रुपये.

* दस्तऐवज आकार - १४ लाख ९५ हजार रुपये.

* अनुदानापासूनचे उत्पन्न - ४० कोटी ३२ लाख ७८ हजार ५९३ रुपये.

...